प्रेस मीडिया लाईव्ह :
कोल्हापूर प्रतिनिधी :
जल जीवन मिशन योजनेतील भ्रष्टाचारातील अधिकाऱ्यांना बडतर्फ करा या मागणी करिता पॅंथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे करवीर पंचायत समिती कार्यालयासमोर राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष संतोष आठवले, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष जयसिंगराव कांबळे ,कोल्हापूर जिल्हा महानगर अध्यक्ष अॅड . मुकुंद सनदे यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी अकरा वाजले पासून उपोषण सुरू करण्यात आले .
जल जीवन मिशन अंतर्गत बोलोली तालुका करवीर येथे काम सुरू आहे सध्या या गावांमध्ये पाईपलाईन टाकल्यात आले आहेत व त्याच्या बिलांची उचल ही केली आहे तसेच म्हारुळ तालुका करवीर या गावांमध्ये पाईपलाईन टाकण्यात आलेली आहेत निविदा कागदपत्राप्रमाणे पाईपलाईन टाकण्यात आलेले नाही मुरूम बिडींग डॉक्युमेंट प्रमाणे पाईपलाईनची डेप्थ किती पाईपलाईन टाकण्यात आली याची नोंद एमबी मध्ये दाखवण्यात आले आहेत त्या सर्व स्पॉट वरती दाखवण्यात यावीत व या कामातील भ्रष्टाचार करणाऱ्या ठेकेदार उपअभियंता शाखा अभियंता यांच्यावर कारवाई करून त्यांना बडतर्फ करावे तसेच ठेकेदार याला काळ्या यादीत समाविष्ट करावे या मागणीसाठी करवीर पंचायत समितीच्या कार्यालयासमोर बुधवार दिनांक 5/07/ 2023 पासून सकाळी अकरा वाजल्यापासून पॅंथर आर्मी स्वराज क्रांती सेनेचे कार्यकर्ते उपोषण करीत आहेत यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अजय इंगळे, इचलकरंजी महानगर जिल्हाध्यक्ष त्र्यंबक दातार ,जिल्हा संपर्कप्रमुख समीर विजापूरे, रोहीत कांबळे आदि आंदोलनात सहभागी झाले होते