प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर : - कोल्हापूर महानगरपालिकेत कार्यरत असलेल्या पुरुष कर्मचारी ,तसेच महिला कर्मचारी दैनंदिन नागरी हिताची कामे करत असतात,पण लोकोपयोगी कामे करीत असताना स्वतःच्या आरोग्याकडे त्यांचे दुर्लक्ष होत आहे.
चांगली कामे करण्यासाठी सदुढ़ आणि निरोगी कर्मचारी असणे आवश्यक आहे.त्यामुळे महिला कर्मचारयांच्या आरोग्याच्या दृष्टीने त्याना उदभवणारयां दुर्धर आजाराचे वेळीच निदान होण्यासाठी त्यांची आरोग्य तपासणी मोफत शासकीय ,नामांकीत रुग्णालयात करण्यात यावी.यात सोनोग्राफी ,रक्त तपासणीसाठी काही रुग्णालयात शुल्क आकारले जाते पण या सर्व चाचण्या मोफत करण्यात याव्यात.या पुढ़े वरचेवर कर्मचारयांच्या आरोग्य चाचण्या मोफत करणेत याव्यात.
यात कर्करोग ,मधुमेह ,उच्चरक्तदाब , रक्तातील साखरेचे प्रमाण या सारख्या आजामुळे काही जणांचा मृत्यूही होतो.त्यामुळे अशा प्रकारच्या आजारावर प्रतिबंध आणि नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.कुंटुबांतील इतर सदस्यांवर आणि सामाजिक अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम पाहिला असता अशा प्रकारच्या आजारावर आवश्यक असलेल्या तपासण्या वेळीच करून त्यावर उपाय करणे आवश्यक आहे.आणि मधुमेह व रक्तदाब हे आजारी रुग्णांच्या बाबतीत त्यांच्या दैनंदिन जीवनात मृत्युस कारणीभूत ठरतात.महिलाच्यांत असलेल्या स्तन आणि गर्भपिशवीचा कर्करोगाचे प्रमाण जास्त आहे.अशा प्रकाच्या आजाराची तपासणी करून यासाठी महिलांनीही याकडे गांभीर्याने आणि काळजीपूर्वक अशा प्रकारच्या चाचण्या करून घेणे आवश्यक आहे.त्यामुळेच कोल्हापूर महानगरपालिकेने कर्मचारी आणि महिला कर्मचारयां साठी मोफत आरोग्य तपासणी उपलब्ध करून दयाव्यात.