प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर -विवाहित महिलेस ठार मारण्याचा प्रयत्न करून तिच्या अंगावरील जबरदस्तीने दागीने काढ़ून घेणारा चोरटा धीरज रामचंद्र आयवळे (वय 19 ,सध्या रा.कणेरी ता.करवीर ) याला स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलिसांनी अटक करून चाळीस हजार रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की ,आरोपी धीरज याने विवाहित महिलेस मोबाईल वरून धमकी देत भेटावयास बोलावुन घेतले असता त्या विवाहित महिलेने माझे आता लग्न झाले आहे मला फोन करून त्रास देऊ नका असे म्हणताच धीरज याने त्या महिलेस शिवीगाळ करीत मारहाण करून तेथे जवळच पडलेला दगड मारुन जखमी करून त्या महिलेच्या अंगावरील दागिने आणि मोबाईल घेऊन पसार झाला होता.त्याला स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने कागल येथे एसटी स्टँड परिसरात ताब्यात घेऊन त्याच्या कडील 40 ,000/ रुपये कि मंतीचा मुद्देमाल जप्त केला.ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक श्री.महादेव वाघमोडे ,सहा.फौजदार सुनिल कवळेकर यांच्यासह त्यांच्या पथकाने केली.