पापाची तिकटी येथील लक्ष्मी गल्लीतील नागरिकांची विचारणा
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर- पापाची तिकटी येथे लक्ष्मी गल्लीत या ठिकाणी असलेला विध्युत पोल हा फार वर्षाचा असून तो गंजून मोडकळीस आलेला आहे.त्याच्या उच्च दाबाच्या वाहिन्या तेथे असलेल्या घरांवरुन गेल्या आहेत. या पोल मुळे तेथील रहिवाशी अमर जाधव यांच्या रहात्या घराची भिंत खचली होती त्यामुळे घर उतरविण्यासाठी आणि नवीन घर बांधण्यासाठी कोणीही कॉंण्ट्रक्टर तयार होत नव्हते.त्यामुळे आठ,दहा दिवसापूर्वी झालेल्या पावसात जाधव यांच्या घराची भिंत कोसळली या मध्ये मोठी जिवीतहानी झाली नसली तरी घराचे मोठे नुकसान झालं आहे.
अमर जाधव हे वृत्तपत्र विक्र्रेते असून ते त्या ठिकाणी 32 वर्षा पासून रहात आहेत.त्या पोल मुळे तेथे असलेल्या काही घरांना तडा गेला आहे.या बाबत अमर जाधव यांनी महावितरणकडे गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करत तो पोल इतरत्र हलविण्याची मागणी करुन ही त्या कडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे.त्यांना कोणतेही यांचे गांभीर्य नाही.हा पोल बदलण्या साठी राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी निधी उपलब्ध करून दिला आहे.जिल्हा नियोजन समितीतुन पूर्ण गल्लीतील विध्युत वाहिन्या भुमीगत करण्यासाठी निधी उपलब्ध आहे.पण तरी सुद्धा महावितरणने अद्याप पोल बदलेला नाही.यामागचे गौडबंगाल काय अशी विचारणा होत आहे.मोठी दुर्घटना घडल्यावर डोळे उघडणार काय ? तरी संबंधित विभागाने होणारी हानी टाळून तो पोल इतरत्र हलवुन तेथील लोकांना न्याय द्यावा.