प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर : काल दिनांक १५/०७/२०२३ मा.महेंद्र पंडित, पोलीस अधीक्षक, कोलापूर यांनी जिल्हयातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व सर्व प्रशासकीय शाखाने प्रमुख यांची प्रशासकीय कामकाज त्याचप्रमाण आगामी सण, उत्सव या अनुषंगाने मिटींग घेवून सर्व विषयावर सविस्तर चर्चा करून मार्गदर्शनपर सूचना दिल्या. मा. पोलीस अधीक्षक सो कोल्हापूर यांनी पोलीस ठाणेकडे सपासवर प्रलंबीत असलेले गुन्हे मयत प्रकरणे, नागरीकांचे कडुन प्राप्त तक्रारी अर्ज याची माहिती घेवुन ते कोण कोणत्या कारणास्तव प्रलंबीत आहेत याचा आढावा घेवून संबधीत प्रभारी अधिकारी यांना तपास पुर्ण करून मुदतीत दोषारोप दाखल करणे व दोष सिध्यांचे प्रमाण वाढणेसाठी प्रत्येक गुन्हयाचा तपास योग्य व शास्त्रोक्त पद्धतीने करणे बाबत सूचना देण्यात आल्या.
महिला अत्याचाराचे गुन्हे घडु नयेत यासाठी नागरीकांचेत जन जागृती करून प्रचलीत कायद्यातील कठोर तरतुदीची माहिती करून द्यावी. त्याचप्रमाणे नागरीकांचे कडुन प्राप्त तक्रारी अर्जाची वेळेत चौकशी करून निर्गती करणे बाबत सुचना देण्यात आल्या. माला विरुध्वने गुन्हे चोरी, घरफोडी, चैन स्नॅचिंग, बाहन चोरी असे दाखल गुन्हे जास्तीत जास्त उघडकीस आणनेच्या दृष्टीने योग्यते ठोस प्रयत्न करावेत. त्याचप्रमाणे चोरी व घरफोडी सारख्या गुन्हयाना आळा पाळणेसाठी सगत रात्रगत व पेट्रोलींग करीता अमलदार नेमावेत. संशयीतात्रेकडे कसुन चौकशी करावी.
सायबर क्राईम, गुन्हेगारीवर लक्ष केंद्रीत करुन गुन्हेगारीला वेळीच आळा घालणेसाठी योग्यत्या उपाय योजना कराव्यात. या अनुषंगाने सायबर पोलीस ठाणेच्या प्रभारी यांना सुचना देण्यात आल्या. आर्थिक गुन्हे शाखे कडुन लोकांना जादा परताव्याचे अमिष दाखवुन व याच खाजगी संस्था पैसे गुंतवणुक करणेसाठी भाग पाडुन लोकांची आर्थीक फसवणुकीचे प्रकार होत आहेत. त्याबाबत नागरीकांचेमध्ये जनजागृती करावी व अशा प्रकारच्या गुन्हयाना आळा घालण्यासाठी उपाययोना करणे बाबत सुचना दिल्या. त्याच प्रमाणे जिल्हा विशेष शाखा, व पासपोर्ट विभाग यांचेकडे असलेल्या कामकाजाचा आढवा घेवुन कामाची वेळेत निर्गती होईल याकडे लक्ष पुरवीणे दाबत सुचना दिलेल्या आहेत. अवैध व्यवसाय करणा-यांचेवर कठोर कारवाई करुन, अवैध व्यवसायाचे समुळ उच्चाटण करावे अशा सुचना देण्यात आल्या.
आगामी मोहरम, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती, नागपंचमी कृष्ण जन्मअष्ठमी, दही हंडी, गणेशोत्सव, नवरात्र उत्सव असे सण कोणतीही बाधा निर्माण न होता सुरळीत पारपडावेत या करीता जी जी मंडळे मोहरम गणेशोत्सव, जयंती दही हंडी उत्सव साजरी करतात अशा मंडळांची आतापासुन माहिती संकलीत करावी. शांतता समितीची मिटींग घेवुन मार्गदर्शन करावे. गत वर्षी (सन २०२२) मध्ये ज्या ज्या
व्यक्तीच्या पासुन सण उत्सवामध्ये उपद्रव निर्माण झाला, अशा समाज कंटकांची यादी तयार करून त्यांची गुन्हेगारी पार्श्वभुमी लक्षात घेवुन आवश्यक्ते प्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाई करावी. त्याचप्रमाणे हद्दपारी, एमपीटीए प्रमाणे कारवाई करावी, जास्तीत जास्त प्रतिबंधात्मक कारवाया कराव्यात, फरारी, पाहिजे असलेले
आरोपीचा शोध घ्यावा. रेकॉर्ड वरील, तसेच हद्दपार आरोपी चेक करावेत अशा सक्त सुचना दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे प्रशासकीय शाखेचे प्रमुख यांनाही प्रलंबीत प्रकरगांची वेळेत निर्मती करणे बाबत सुचना दिल्या. मिटींगअंती मा पोलीस अधीक्षक सो यांनी जिल्हयामध्ये सी.सी.टी.एन.एस प्रणाली उत्कृष्ट प्रकारे काम करणारे पोलीस अमंलदार व महिला पोलीस अमंलदार ११६९ शिल्पा आडके, २३८१ इशांद महात, ५५५ भारती मोहिते, २२०१ मेघा जाधव, १५५१ ऋषीकेश पाटील, ६३ सोनाली पाटील, २२२२ सरीता सुतार, २२४१ रंजना कोरवी, २३९५ निशीगंधा कुंभार, २२५३ राहुल केंगार, ७९२ वंदना पसारे यांना प्रशस्तीपत्र देवुन गौरवीण्यात आले.
सदर मिटीग करीता अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, श्री खाटमोडे-पाटील तसेच सहा पोलीस अधीक्षक अन्नपुर्णा सिंह, सर्व उप विभागीय पोलीस अधीकारी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, जिल्हा विषेश शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, सर्व पोलीस ठाणे व प्रशासकीय
शाखेचे प्रभारी अधिकारी हे उपस्थित होते.