मणिपूरमध्ये आदिवासीवर अन्याय, अत्याचार करणाऱ्या दोषींवर कडक कारवाई करावी..



प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

 कोल्हापूर जिल्ह्यातील पुरोगामी संघटना, मुलनिवासी संघटना, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, रिपब्लिकन सेना, स्वराज्य संस्था, ताराराणी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड अशा अनेक सामाजिक संघटनांच्या माध्यमातून, मणिपूर येथे आदिवासी महिलांच्यावर झालेल्या, अमानवी, अमानुष कृत्याच्या निषेधार्थ, भर पावसात आंदोलन करत निषेध नोंदवला.

यावेळी महिलांनी संतप्त प्रतिक्रिया देत, भावनांचा उद्रेक करत, संताप व्यक्त केला, आणि अशा मनुवादी प्रवृतींना, कठोर शिक्षा देऊन, आदिवासी महिलांना न्याय मिळालाच पाहिजे, अशा तीव्र भावना व्यक्त केल्या........हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी, इंदिरा पटवर्धन, आशालता सरनाईक, स्वाती काळे, निकिता माने, सीमा पाटील, संगिता कांबळे, वैशाली कंगणे, कवाळे मॅडम, बावडेकर मॅडम, यांचे विशेष योगदान लाभले......


Post a Comment

Previous Post Next Post