किरीट सोमय्या या वर्षी कागल ऊरुसात जेवायला येणार

 आता राहुल गांधी आणि मोदी एकत्र आले कि डोळे मिटायला बरे  ....जनतेच्या प्रतिक्रिया..  


प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर - काल राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्ग्ज नेते भाजप पक्षात गेल्यामुळे जनतेच्या सोशल मिडीया वरती विवीध स्टेटस ठेऊन आपल्या भावना व्यक्त केल्या जात आहेत. मुख्यमंत्री पदासाठी ठाकरे आणि फडणवीस यांच्यात ठिणगी पडली होती.यामुळे फडणवीस यांनी अजित पवार यांना सोबत घेऊन पहाटेचा झालेला शपथविधी चांगलाच चर्चेत होता.

या दोघांना बहुमत सिध्द न करता आल्यामुळे यांचे सरकार पडले होते.त्यानंतर कॉग्रेंस ,शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांनी एकत्र येऊन महाविकास आघाडी स्थापन करून काही काळ हे सरकार व्यवस्थित चालू होते.भाजप सरकाने यांच्यात फूट पाडुन एकनाथ शिंदेना बरोबर घेऊन नवीन सरकार स्थापन केले. हे ही सुरळीत चालू असताना काल अजित पवार यांनी आपल्या मोठ्या गटासह भाजपला जाऊन मिळाला.त्यामुळे परत एकदा राज्यात गोंधळ उडाला आणि काही कार्यकार्यकर्त्यांसह जनतेतून नाराजी पसरली.या राजकीय घडामोडी नंतर काहीनी स्टेटस ठेऊन चांगल्या शेलक्या भाषेत जनतेने पुढ़ील प्रमाने भावना व्यक्त केल्या.

येथुन पुढ़े निवडणूक आयोगाने आमच्या बोटाला शाई नको चुना लावा ,सावधान मतदान कार्ड विकणे आहे ,गुरु पोर्णिमेला मोदीनी शरद पवार यांना गुरुदशिणा दिली ,शपथविधी असा करा की सगळ्यांनीच तोडांत बोटे घातली पाहिजेत , सासूमुळे वाटणी केली सासूच वाट्याला आली ,ईडी आणि सीबीआयवाल्यांना सुट्या जाहीर करुन बोनस मिळणार ,अजून एक उपमुख्यमंत्री करा म्हणजे तीन शिफ्ट मध्ये काम करतील एमआयडीसी. यावर्षी कागलच्या ऊरसात किरीट सोमय्या जेवायला येणार ,आता बिधास्त ईडीची पीडा गेली.अशा प्रकारे जनतेने स्टेटस द्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post