प्रेमाची भुरळ घालून जबरी चोरी करणारया एका महिलेसह पाच जणांना अटक करून एक लाख 12 हजारांचा मुद्देमाल जप्त

    


प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

     कोल्हापुर-करवीर तालुक्यातील जठारवाडी येथील किरण उत्तम पाटील याला शुभांगी नावाच्या महिलेने बनावट इंन्साट्रागाम अंकौन्ट द्वारे ओळख वाढ़वून या महिलेने बालिंगा पाडळी येथे आविष्कार हायस्कूल येथे भेटण्यास बोलविले असता किरण पाटील 25/6/23 रोजी दिड वाजता भेटावयास गेले असता दुचाकी वरुन आलेल्या तिघां जणानी किरण पाटील यांची गाडी अडवून बहिणीची छेड काढ़तोस का म्हणत झटापट करून मारहाण करून त्यांच्या कडील रोख रक्कम आणि मोबाईल हिसकावून घेऊन पळून गेले.

या प्रकरणी संशयीवर करवीर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.या नुसार करवीर पोलिस तपास करीत असता शुभांगी नावाने कुणी अकौन्ट चालू केले आहे का याची तांत्रीक माहिती घेत असताना आकुर्डे येथील कोमल कृष्णात पाटील या महिलेने शुभांगी कदम या नावाने फ़ेक अकोन्ट सुरु केल्याचे समजले या महिलेकडे चोकशी केली असता किरण पाटील यांची आणि कोमल पाटील यांची अगोदर पासूनची ओळख आहे. किरण हा कोमलशी अश्लिल बोलुन तुझे फोटो माझ्याकडे आहे ते व्हायरल करण्याची धमकी देत असे .ही माहिती कोमल हिने आपला दिर इंद्रजित पाटील याला सांगूण त्याचा काटा काढायला सांगितले .इंद्रजित पाटील याने आपले मित्र 1) नितीन पाटील 2) मोहसिन मुल्ला 3) करण रेणुसे (सर्व रा.कोपार्डे).यांच्या मदतीने किरण पाटील याला मारहाण करून मोबाईल आणि रोख 2000/ रुपये.घेऊन पळून गेले होते.ही कारवाई मा.पोलिस अधीक्षक श्री.महेन्द्र पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक श्री.महादेव वाघमोडे ,उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या पथकाने तपास करुन गुन्हा उघडकीस आणून त्यांच्या कडील या गुन्हयात वापरलेल्या दोन दुचाकीसह मोबाईल आणि रोख 2000/ रुपयेसह एकूण एक लाख 12 हजारांचा मुड्डेमाल जप्त करून पुढ़ील तपासा साठी करवीर पोलिसांच्या ताब्यात दिले.

Post a Comment

Previous Post Next Post