शहरात होत असलेल्या घरफोड्यांचे वाढ़ते प्रमाणामुळे रात्रीच्या गस्तीत वाढ़ होणे गरजेचे .... नागरिकांतुन मागणी .

 


प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

 कोल्हापूर-शहरात तसेच उपनगरात चोरट्यांनी धुमाकुळ घातला आहे.तसेच गेल्या काही दिवसांपासून शहरात सुव्यवस्था ही बिघडलेली आहे. काही ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय घेतला आहे महत्वाचे म्हणजे अशा घटना घडू नयेत या साठी काळजी घेणे आवश्यक आहे.

या साठी पोलिसांचा वावर रस्त्यावर जास्तीतजास्त कसा राहील या साठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.पोलिस आयुक्तां कडुन बाजारपेठ ,शाळा,कॉलेज ,हॉस्टेल क्लासेस ,अशा ठिकाणी दामिनी पथके ,बीट मार्शल यांची देखील गस्त वाढ़विणे गरजेचे आहे.शहरातील मोक्याच्या ठिकाणी दिवसा आणि रात्री नाकाबंदी करून तपासणी करण्यात यावी.काही ठिकाणच्या हल्ल्या सारख्या अनेक ठिकाणी घटना घडत असून शहरातील वाढ़ती गुन्हेगारी मोडीत काढून विशेष पाऊले वेळीच ऊचलली पाहिजेत.प्रत्येक गुन्हेगारावर नजर ठेवून अल्पवयीन गुन्हेगारीवर वचक ठेवण्यासाठी बंद अवस्थेत असलेले सीसीटीव्ही देखील चालू करण्यात यावे.तसेच दामिनी आणि बीट मार्शल यांची संख्या वाढ़वुन महिला वस्तीगृह ,मॉल्स ,शाळा ,कॉलेज , बाजारपेठा आदी ठिकाणी नियमीतपणे  गस्त घालण्याच्या गरजा आहेत.तसेच गुंडगिरी करणारया गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी गुंड ,शहराची सुव्यवस्था बिघडविणारे ज्या ठिकाणी रहातात त्या भागात कॉम्बिंग ऑपरेशन राबविण्यात यावे.तडीपार गुंडावर विशेष लक्ष द्यावे.या सगळ्या प्रकारची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.

Post a Comment

Previous Post Next Post