कोल्हापूर जिल्हयात ठिकठिकाणी नाकाबंदी ; पोलिसांची धडक कारवाई.



प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

  कोल्हापूर-कोल्हापूर पोलिसांनी काल रात्री अचानक कोंम्बिंग ऑपरेशन करीत नाकाबंदी करून प्रत्येक वाहना सह नागरिकांची कसून तपासणी करीत रेकॉर्ड वरील गुन्हेंगारासह फरारी ,हद्दपार असलेल्या आरोंपीची तपासणी करण्यात आली.


सदरची कारवाई रात्री 6 ते सकाळी 6 वाजेपर्यंत तपासणी करण्यात आली आहे.कोल्हापूर जिल्ह्यात 39 ठिकाणी नाकाबंदी करून 1641वाहनांची तपासणी करून यात 342 वाहन धारकांकडुन मोटार वाहन कायदा अंतर्गत एक लाख एक हजार 430रुपयांचा दंड वसूल करण्यात आला .तर 9 जणांवर गुन्हें दाखल करण्यात आले.

रेकॉर्ड वरील गुन्हेंगाराची तपासणी केली असता 53 गुन्हेगार मिळून आले.आणि बेकायदेशीर जुगार खेळणारया 281जणा कडुन एक लाख 44 हजार रुपयांचा माल हस्तगत करुन त्याच्यावर कारवाई करण्यात आली.कोल्हापूर जिल्ह्यातील 13 जण हद्दपार असलेल्यांची तपासणी आली.स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक श्री.महादेव वाघमोडे यांनी आपल्या पथकच्या मदतीने 9 हद्दपार आरोपीची तपासणी केली असता त्यातिल तिघे जण कोल्हापूर जि ल्हयात मिळून आले .1)अजित नाडगौडा  2)धीरज शर्मा 3)नासीर बागवान अशी त्याची नावे असून या तिघांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.तर राजवाडा पोलिस ठाण्यातील हद्दपार असलेला स्वप्निल घाटगे याला ताब्यात घेऊन याच्यावर ही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई रात्री उशिरापर्यंत पर्यंत असलेल्या आस्थापनेवरही कारवाई करण्यात आली.ही कारवाई मा.पोलिस अधीक्षक श्री.महेंद्र पंडीत यांनीही स्वतः भाग घेऊन अप्पर पोलिस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई,श्री.निकेश खाटमोडे -पाटील ,कोल्हापूर  जिल्हयातील सर्व पोलिस अधिकारी तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषणचे श्री.महादेव वाघमोडे यांच्यासह यांच्या पथकाने सहभाग घेतला आदीनी भाग घेतला.

Post a Comment

Previous Post Next Post