लाच प्रकरणी अटक महिला पोलीस कॉन्स्टेबल काजल लोंढे
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर- तक्रार अर्जाची निकाली काढ़लेल्या समन्स ची प्रत देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच घेताना महिला कॉन्स्टेबल काजल गणेश लोंढ़े ब.न.217 (वय 28 रा.बंगला नं.10 ,तिसरा मजला पार्वती कंन्सट्रकशन,सरनोबतवाडी ) असे लाच घेणारया महिलेचे नाव आहे.या पोलिस मुख्यालयात महिला सहाय्य कक्षात गेल्या आठ महिन्यांपासून कार्यरत आहेत त्याची 2014 ला जॉईनिंग आहे.
अधिक माहिती अशी की,तक्रारदार यांनी घरगुती कारणातुन पत्नीच्या विरोधात महिला सहाय्य कक्षाकडे तक्रार अर्ज दाखल करण्यात आला होता तो अर्ज निकाली काढ़ण्यात आला .त्या निकाली काढ़लेल्या अर्जाची समन्सची प्रत ची मागणी केली असता महिला कॉ.काजल लोंढ़े यांनी प्रत देणेसाठी तक्रारदाराकडे दोन हजार रुपयांची लाचेची मागणी केली असता तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.लाचलूचपत विभागाने पडताळणी करून सापळा रचून सदर काजल लोंढ़ेला दोन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडून कारवाई केली.या कामी लाचलुचपत सांगली पोलिसांची मदत झाली.ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक श्री.सरदार नाळे ,पोलिस निरीक्षक दत्तात्रय पुजारी ,संगीता गावडे ,पुनम पाटील यांच्यासह त्यांच्या पथकाने कारवाई केली.