कर्नाटकातील निपाणी येथुन विक्री साठी आणलेल्या गुटख्यासह टाटा माझा कार जप्त



प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

    कोल्हापूर- महाराष्ट्रात पान मसाला ,गुटखा ,सुगंधी तंबाखू अशा प्रकारची उत्पादन किंवा विक्री करण्यास बंदी आहे.तरी सुद्धा काही जण चोरुन बाहेरच्या राज्यातुन आणून विक्री होत असल्याचे समजले वरून वरिष्ठांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले होते.त्या नुसार तपास करीत असताना या पथकाला कर्नाटकातील निपाणी येथुन टाटा कार माझा गाडीतुन कंदलगाव ते पाचगाव मार्गे येत असल्याचे समजले वरून तेथे सापळा लावुन उमर मौला पेंढ़ारी (वय 27,रा.फुलेवाडी ).यास गाडी नं.एमएच 09 बीएक्स 4864ही गाडी अडवून तपासणी केली असता गाडीच्या डिकीत आरएमडी ,विमल ,मुसाफिर , सुगंधी तंबाखू (गुटखा ).असा मुद्देमाल मिळून आला असता त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने कर्नाटकातील निपाणी येथुन विक्री साठी घेऊन आणल्याचे सांगितले असता त्याच्या कडील एक लाख 71 हजार 350 रुपये कि मंतीचा गुटखा आणि दोन लाख 50 हजार कि मंतीची कार गाडी असा एकूण 4 लाख 21 हजार 350 रुपये कि मंतीचा मुद्देमाल जप्त करून उमर पेंढ़ारी याला पुढ़ील कारवाई साठी करवीर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

अधिक तपास करवीर  पोलिस ठाणे करीत आहे.सदरची कारवाई पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत ,अप्पर पोलिस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई,स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक श्री.महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अंमलदार बालाजी पाटील,दिपक घोरपडे,हिंदुराव पाटील,केसरे ,आणि सोमराज पाटील यांनी केली.

Post a Comment

Previous Post Next Post