आठवडी बाजारात चोरांचा सुळसुळाट एकाच दिवशी 10 मोबाईल लंपास



 प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :       

 कोल्हापूर-  रविवार आठवडी बाजार असल्याने  नोकरदारवर्ग ,विवीध घटकात काम करणारा कामगार आसपासच्या परिसरातुन नागरिक ज्या ठिकाणी आठवडा बाजार भरतो त्या ठिकाणी खरेदी साठी येत असतो .या संधीचा फायदा घेत चोरटे गर्दीचा फायदा घेत आपले काम फत्ते करून निघून जातात.यात कूणाची पर्स ,कुणाचे मोबाईल गायब केले जातात.

आठवडी बाजारात मोक्याच्या ठिकाणी चोरांचा सुळसुळाट वाढ़ला असून आज तर गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी      लक्ष्मीपुरी भाजी मंडई,दसरा चौक बस स्टॉप,तसेच गंगावेश भाजी मंडईत अशा आज एकाच दिवशी 10 जणांचे मोबाईल गेल्याची तक्रार लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.या मुळे खरेदीसाठी आलेल्यांच्यात भितीचे वातावरण पसरलं आहे.

Post a Comment

Previous Post Next Post