केएमटी बस खाली शाळकरी मुलीचा अपघाती मृत्यु



प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

   कोल्हापूर- साने गुरुजी येथील अंगणवाडीत शिकणारी संस्कृती रत्नदिप खरात (वय  4, रा.फोर्ड कॉर्नर ,लक्ष्मीपुरी )..हिचा दुचाकी वरुन खाली पडली असता पाठी मागून येणारया केमटी बसचे चाक अंगावरुन गेल्याने संस्कृतीचा जागीच अपघाती मृत्यु झाला.

ही घटना सकाळी साने गुरुजी केमटी बस स्टॉप जवळ घडली.अधिक माहिती अशी की,संस्कृती ही आपली आई स्नेहा रत्नंदिप खरात यांच्या समवेत शाळेत दुचाकी वरुन जात असताना तेथील केमटी बस स्टॉप जवळ थांबलेल्या बस ला ओव्हर टेक करताना तेथे असलेल्या स्पीडबेकरमुळे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने संस्कृती खाली पडली असता पाठी मागून येणारया केमटी बस चे चाक अंगावर गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.तेथील नागरिकांनी तिला जवळच असलेल्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तिचा उपचारा पूर्वीच मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितले .सीपीआर मध्ये उत्तरीय तपासणी करून मुलीचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.अशा प्रकारे मुलीचा अपघाती मृत्यु झाल्याने नातेवाईकांना मोठा धक्का बसला आहे.या घटनेची नोंद जुना राजवाडा पोलिस ठाण्यात झाली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post