प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर- टेंबलाईवाडीतील लक्ष्मी कॉलनी येथील ऋतजा स्वपनील कांबळे (वय 22) ही विवाहिता गेल्या चार दिवसापासून कोणाला न सांगता रहात्या घरातुन बेपत्ता झाली होती. काल बांलिंगे -दोनवडे दरम्यान असलेल्या भोगावती नदीत या विवाहितेचा मृतदेह सापडला .
तिच्या नातेवाईकांना बोलवून करवीर पोलिसांनी खातरजमा केली.तिचा पती स्वपनीलने ऋतजाचा मृतदेह असल्याचे सांगितले.नागदेववाडी येथील काही मुले शनिवारी संध्याकाळी पोहायला गेले होते.त्याना महिलेचा मृतदेह तंरगताना दिसला .याची माहिती बालिंगे येथील पोलिस पाटील सुरेश पाटील यांना देण्यात आली.त्यानी ही माहिती करवीर पोलिसांना दिली.करवीर पोलिसांनी घटना स्थळी येऊन पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी साठी शासकीय रुग्णालयात पाठविला.