प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर- शाहू टोल नाक्या जवळ असलेल्या लक्षमणराव ढ़ोबळे वस्तीगृहाच्या बांधलेल्या इमारती वरुन पाचगाव येथील बळवंतनगर येथे रहाणारया आर्यन राजेंद्र पाटील (वय 16)या अकरावीत शिकणारया विध्यार्थाने उच इमारती वरुन आत्महत्या केली.तो दहावीचा निकाल लागल्या पासून निराश होता.
अधिक माहिती अशी की ,आर्यन पाटील हा आपल्या मित्रासमवेत खेळायला जातो असे सांगून घरातुन बाहेर पडला होता.तो टर्फ मैदानावर सायंकाळी साडेसहा प्रर्यत खेळत होता.सर्व मित्र घरी जात होते.यावेळी आर्यन आपलया मित्रांना थोड्या वेळाने जातो असे सांगून वस्तीगृहाच्या इमारतीकडे गेला .रात्री नऊ वाजले तरी आर्यन घरी आला नसल्याने घरच्यांनी मित्रांच्याकडे चौकशी केली.त्या वेळी मित्रानी मोरेवाडी परिसरात थांबल्याचे सांगून त्याच्या वडीलांनी आणि मित्रानी शोधाशोध चालू केली.यावेळी अर्धवट अवस्थेत असलेल्या इमारतीच्या पाठीमागील बाजूस कोणीतरी तेथे विव्हळत पडल्याचे दिसून आले सर्व जण तेथे आवाजाच्या दिशेने गेले असता आर्यन दिसून आला .वडीलानी आर्यन ला विचारले असता त्याने उडी मारल्याचे सांगीतलं.आर्यनला जखमी अवस्थेत उपचारा साठी खाजगी रुग्णालयात दाखल केले पण उपचारा पूर्वीच त्याचा मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले . आर्यनचे वडील राजेंद्र पाटील हे शिवाजी विध्यापीठात नोकरीस आहेत.