प्रेस मीडिया लाईव्ह :
दिनेश महाडिक :
मुंबई पुणे जुना हायवे वर अतिवृष्टीमुळे NH 48 या हायवेवर जागोजागी पावसाचे पाणी जास्त प्रमाणात जमा होऊन संपूर्ण रस्ता पाण्याखाली गेला आहे . m.m.t.i या करोते येथील ट्रेनिंग सेंटर समोर ,पद्मावती पेट्रोल पंप समोर तसेच लोधीवली दांड फाट्याजवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचून रस्ता पाण्याखाली गेला आहे .
कोणतेही वाहन पाण्यात जाऊन बंद अथवा वेगळे प्रकार घडू नये म्हणून पलस्पे हायवे ट्राफिक पोलीस व सगळे सहकारी पोलीस हवालदार श्री राजेंद्र बर्गे श्री राकेश मोरे श्री जमीर मुलानी श्री नितीन सोनवणे श्री.विनोद पाटील निलेश कावरे श्री प्रवीण पाटील श्री भीमराव पाटील तसेच आय आर बी चा संपूर्ण स्टाफ व मृत्युंजय ग्रुपचे श्री दिनेश महाडिक विनेगाव व श्री.अमोल कदम वावंढळ चे उपसरपंच, श्री. राकेश भाई कदम संपादक रयतेचा रायगड व खालापुरातील आदर्श व्यक्तिमत्व तसेच सामाजिक कार्यकर्ते माजी सभापती ,श्री. श्याम भाई साळवी व ,श्री.तुळशीरामजी पाटील सामाजिक कार्यकर्ते कलोते हे सर्व NH 48 या हायवेवर अतोनात मेहनत घेत आहेत व नागरिकांची सुरक्षा करीत आहेत . याच बरोबर वाहतूक सुद्धा सुरळीत केली आहे . आपल्या सर्वांच्या प्रयत्नाने व सहकार्याने कोणतीही जीवित हानी झालेली नाही व कोणतीही अडचण निर्माण झाली नाही.या कामा बाबत सर्वांचे सर्वत्र कौतुक होत आहे