प्रेस मीडिया लाईव्ह :
दिनेश महाडिक :
उरण मतदार संघातील चौक जिल्हा परिषद सदस्य माननीय मोतीरामजी ठोंबरे साहेब यांच्या संकल्पनेतून उरण मतदारसंघातील चौक विभाग, वासंबे विभाग, वडगाव विभागातील सर्व 10 व 12 च्या उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी (प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक झालेल्या) विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा चौक येथील पोतदार हॉल शिवसेना शाखे शेजारी येथे पार पाडला.
या सोहळ्यासाठी माननीय श्री मोतीरामजी ठोंबरे साहेब यांच्या संकल्पनेतून विशेष आमंत्रण देण्यात आले. माननीय माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख मनोहर शेठ भोईर व माननीय श्री एकनाथजी पिंगळे तालुकाप्रमुख खालापूर यांच्या सहकार्याने तसेच शिवसेना शाखा चौक व सर्व शिवसैनिकांच्या मेहनतीने या सोहळ्याचे नियोजन करण्यात आले होते.सदर या सोहळा साठी उपस्थित मा. आमदार तथा जिल्हाप्रमुख माननीय श्री. मनोहर शेठ भोईर यांच्या हस्ते प्रथमता शिवछत्रपती शिवाजी राजे यांचे पुष्प माला अर्पण करून तदनंतर वंदनीय श्रीमान हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना पुष्प माला अर्पण करून इतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.
या सोहळ्यासाठी खालील प्रमाणे उरण मतदार संघातील या शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते. सरनोबत नेताजी पालकर विद्यामंदिर चौक, वावरले शाळा ,बोरगाव शाळा ,टीएमटी असरोटी शाळा ,सारंग शाळा ,अंबानी शाळा लोधीवळी, सेंट जोसेफ शाळा लोधीवली, वाशिवली पारनेर हायस्कूल, गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल,जनता हायस्कूल मोहोपाडा ,पिल्ले मोहोपाडा , प्रिया स्कूल मोहोपाडा, माझगाव हायस्कूल. या शाळेच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता.
या सोहळ्यासाठी आमंत्रित प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख श्री. मनोहर शेठ भोईर, माननीय श्री. मोतीराम जी ठोंबरे जिल्हा परिषद सदस्य, माननीय श्री .एकनाथजी पिंगळे तालुकाप्रमुख खालापूर, ज्येष्ठ शिवसैनिक माननीय श्री. एकनाथजी मते साहेब, ज्येष्ठ शिवसैनिक माननीय श्री. प्रफुलजी महाडिक, माननीय श्री. सुहासजी कदम सरपंच वांवढळ, माननीय श्री. पप्पू शेठ विचारे वावरले माजी सरपंच, माननीय श्री .उत्तम शेठ भोईर मराठा समाज रायगड जिल्हा अध्यक्ष, माननीय सौ. अनिताताई पाटील उपसंघटिका रायगड, माननीय श्री. विष्णू खैर माजी सरपंच वावरले, माननीय श्री जग्गू हातमोडे शिवसैनिक चौक, माननीय श्री. सचिन मते माजी सरपंच चौक, माननीय श्री. सुहास देशपांडे शहरप्रमुख चौक, माननीय श्री. निखिल मालुसरे ग्रामपंचायत सदस्य चौक (युवा सेना अधिकारी तालुका संघटक), माननीय श्री. अजिंक्य चौधरी ग्रामपंचायत सदस्य चौक, माननीय श्री.विपुल पार्टे वावरले, माननीय श्री. मनोहर देशमुख तंटामुक्ती अध्यक्ष चौक व आजी-माजी ज्येष्ठ शिवसैनिक व पदाधिकारी व बहुसंख्येने विद्यार्थी व पालक वर्ग उपस्थित होते.