इचलकरंजी महानगरपालिकेच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त रक्तदान आणि डोळे तपासणी शिबिर संपन्न





प्रेस मीडिया लाईव्ह : 

     इचलकरंजी महानगरपालिकेच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे या अनुषंगानेआज सोमवार दिनांक 3 जुलै रोजी महानगरपालिका अधिकारी कर्मचारी यांचे सहभागाने  आणि लायन्स ब्लड बँक यांचे सहकार्याने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेले होते सदर रक्तदान शिबिरामध्ये महानगरपालिकेचे उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांचे सह अधिकारी कर्मचारी यांनी  मोठ्या संख्येने रक्तदान करून सहभाग घेतला.

    तसेच लायन्स आय हॉस्पिटल यांच्या सहकार्याने महानगर पालिका अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी मोफत डोळे तपासणी शिबिर संपन्न झाले.


   

Post a Comment

Previous Post Next Post