इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांची शहरातील महानगरपालिकेच्या दोन्ही एस.टि.पी. प्रकल्पास भेट



प्रेस मीडिया लाईव्ह : 

इचलकरंजी :   आज गुरुवार दि.१३ जुलै रोजी महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांनी शहरातील महानगर पालिकेच्या सांगली रोड येथील तसेच टाकवडे वेस येथील दोन्ही एस.टि.पी. प्रकल्पास भेट देऊन पाहणी केली. यावेळी जल अभियंता सुभाष देशपांडे, अभियंता अभय शिरोलीकर आणि कनिष्ठ अभियंता बाजी कांबळे यांनी आयुक्त यांना प्रकल्पाविषयी सविस्तर माहिती दिली. 

  


  मा. आयुक्त यांनी दोन्ही ठिकाणच्या प्रकल्पाच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले.तसेच या प्रकल्पामध्ये काही आवश्यक सुधारणा करण्यासाठी त्याचबरोबर आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावयाचा असेल तर याबाबतचा सविस्तर प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या  तसेच सध्या सुरू असलेल्या नवीन प्रकल्पाच्या कामाची गती वाढविण्याच्या आणि गुणवत्ता पुर्वक काम करणेच्या सूचना जल अभियंता यांना दिल्या.


       

Post a Comment

Previous Post Next Post