रविंद्रनाथ टागोर विद्यानिकेतनचे आठ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा गुणवत्ता यादीत चमकले

 

महापालिका आयुक्तांसह अधिका-यांनी केले यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन 


प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी : प्रतिनिधी : 

राज्य शासनाच्या शिक्षण विभागामार्फत घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत इचलकरंजी महापालिकेच्या रविंद्रनाथ टागोर विद्यानिकेतनचे आठ विद्यार्थी चांगले यश संपादन करत जिल्हा गुणवत्ता यादीत चमकले आहेत.

इचलकरंजी महापालिकेच्या शिक्षण विभागामार्फत चालवण्यात येणाऱ्या रविंद्रनाथ टागोर विद्यानिकेतनमध्ये विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याबरोबरच त्यांच्यातील अंगभूत कला - गुण अधिक विकसित करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केला जातो.त्यामुळे या विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांनी शालेय परीक्षाबरोबरच विविध स्पर्धा परीक्षा व क्रीडा स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करत यशाची परंपरा कायम राखली आहे.नुकताच शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून यामध्ये या विद्यानिकेतनचे आठ विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत चमकले आहेत.

यामध्ये इयत्ता पाचवीतील अन्वय देवदत्त पाटील , यश यल्लाप्पा पुजारी, हर्षवर्धन सिद्राम पोवार , राजवर्धन सिद्राम पोवार , अन्विका हेमंत जाधव तर इयत्ता आठवीतील  पद्मजा मधुकर कुंभार ,शिवराज प्रकाश बुचडे , गोविंद मल्लिकार्जुन अंगडी या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे इचलकरंजी महानगरपालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे,उपायुक्त डॉ.प्रदीप ठेंगल,उपायुक्त तैमूर मुल्लाणी,सहाय्यक आयुक्त केतन गुजर , शिक्षण विभाग प्रशासन अधिकारी सौ नम्रता गुरसाळे व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.अलका शेलार यांनी अभिनंदन केले.यावेळी सर्व शिक्षक , विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post