एन.यु.एच.एम. अंतर्गत शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कामकाजाचा आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांच्या कडुन आढावा



प्रेस मीडिया लाईव्ह : 

     इचलकरंजी महानगरपालिका क्षेत्रात एन.यु.एच.एम. अंतर्गत सध्या ६ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि ३ आरोग्य वर्धिनी केंद्रा मार्फत शहरातील नागरिकांना आरोग्य सेवा पुरविले जाते.  महानगरपालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्येकडुन महानगरपालिकेच्या विविध विभागांचा आढावा घेतला जात आहे. या अनुषंगाने आज मंगळवार दि.२५ जुलै रोजी महानगर पालिका क्षेत्रातील एन.यु.एच.एम.विभागाच्या आढावा बैठकीचे आयोजन केले होते.

सदर बैठकीस उपायुक्त तैमूर मुलाणी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ रणवीर, एन.यु.एच.एम. जिल्हा प्रकल्प अधिकारी डॉ.स्मिता खंदारे, महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ सुनिलदत्त संगेवार प्रमुख उपस्थिती होती.

    हातकणंगले तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.पी.एस.दातार यांनी शहरातील आरोग्य केंद्रांची माहिती विषद केली. तसेच इचलकरंजी शहरासाठी नव्याने मंजूर करण्यात आलेल्या ११ आरोग्य वर्धिनी केंद्रा साठी जागा उपलब्ध करून देण्याची विनंती केली.

त्याचबरोबर शहरासाठी नव्याने मंजूर झालेली  ३ नवीन पॉलिक्लीनीक सध्या सुरू असलेल्या ६ प्राथमिक आरोग्य केंद्रामध्येच सुरू करणेचा महत्त्वपूर्ण निर्णय या बैठकीत घेणेत आला. तसेच नवीन ११ आरोग्य वर्धिनी केंद्रासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी मिळकत पर्यवेक्षक सचिन पाटील यांना आवश्यकत्या सुचना दिल्या.सध्या नगरपालिका नियमानुसार एन.यु.एच.एम.विभागावर तालुका वैद्यकीय अधिकारी यांचे नियंत्रण आहे. तथापी सध्या इचलकरंजी महानगरपालिका अस्तित्वात आलेने एन.यु.एच.एम. विभाग  महानगरपालिका प्रशासनाकडे हस्तांतरित करणेबाबत आवश्यक ती कार्यवाही करणेची सुचना आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांनी संबंधितांना केली.त्याच बरोबर शहरातील संभाव्य पुर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आवश्यक त्या सोयी सुविधा पुरविण्याची दक्षता घेणेचे आदेश सुद्धा आयुक्त यांनी दिले.

    या बैठकीस  एन.यु.एच.एम. विभागाकडील अर्चना काशिद, यु.एस बारवाडे, योगिता निउंगरे, अलका कोरे आदी उपस्थित होते.


         

Post a Comment

Previous Post Next Post