प्रेस मीडिया लाईव्ह :
मुसा खलिफा :
इचलकरंजी : संपूर्ण महाराष्ट्रात सर्वोत्कृष्ट पाच पोलिस ठाण्याची निवड करण्यात आली आहे . या यादी मध्ये इचलकरंजी येथील शिवाजीनगर पोलिस ठाण्याला राज्यातील सर्वोत्कृष्ट पोलिस ठाणे म्हणून घोषित करण्यात आले. ही घोषणा राज्याच्या पोलिस महासंचालक कार्यालयाकडून करण्यात आली.
या निवडीची माहिती मिळताच शहरवासीयांतून पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांचेसह कर्मचाऱ्यांचे सर्वत्र जोरदार कौतुक होत आहे . अशी निवड इचलकरंजी शहरात प्रथमच झाली आहे . या बाबतचे लेखी आदेश अप्पर पोलिस महासंचालक संजय सक्सेना यांनी काढले आहेत.
Tags
इचलकरंजी