प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांच्या आदेशानुसार तसेच उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल आणि तैमूर मुलाणी यांच्या मार्गदर्शना नुसार माझी वसुंधरा अभियानांतर्गत विविध कार्यक्रम राबविणेत येत आहेत.
महानगरपालिका क्षेत्रात जास्तीत जास्त नागरिकांच्या कडून वृक्ष लागवड होवून त्यांचे संवर्धन व्हावे आणि इचलकरंजी शहर हरित आणि सुंदर होणेसाठी महानगरपालिकेच्या उद्यान विभागाच्या माध्यमातून शहरातील नागरिकांना विविध स्थानिक प्रजातीच्या रोपांचे वाटप करण्यात येत आहे.
महानगरपालिकेकडुन कागल येथील शासकीय रोपवाटिकेतून विविध स्थानिक प्रजातीच्या एकुण ४५६७ रोपे खरेदी करणेत आलेली आहे.दि. २९ जुलै पासून आज अखेर शहरातील नागरिकांच्या लेखी मागणीनुसार आणि रोप लावण्यासाठी तसेच त्या रोपांचे संगोपन करणेचे हमीपत्र लिहून घेवून एकुण ९६० रोपांचे मोफत वाटप करण्यात आले आहे.
सहा. आयुक्त केतन गुजर यांच्या नियंत्रणाखाली उद्यान पर्यवेक्षक सुनिल बेलेकर, वृक्ष अधिकारी संपत चव्हाण यांचेसह अशोक काकडे,महेश बुचडे, दिलीप मगदुम, मंजुनाथ खंदारे, विशाल माने आदी कर्मचारी याकामी कार्यरत आहेत.