प्रेस मीडिया लाईव्ह :
कोल्हापूर जिल्ह्यासह इचलकरंजी शहरा मध्ये आलेल्या मागील काही वर्षाच्या महापुराच्या पार्श्व भूमीवर जिल्हा प्रशासनाच्या सुचनेनुसार संभाव्य महापुराचा व अतिवृष्टीचा सामना करणेसाठी शहरातील महसूल, पोलिस, पाटबंधारे विभाग, विद्युत वितरण कंपनी, बी.एस.एन.एल, सार्वजनिक आरोग्य विभाग, पशुसंवर्धन विभाग या सर्व शासकीय विभागांचे सहकार्याने इचलकरंजी महानगरपालिकेची आपत्कालीन यंत्रणा सुसज्ज ठेवणेच्या सुचना प्रशासक तथा आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी दिल्या .
या अनुषंगाने आज बुधवार दि.१९ जुलै रोजी इचलकरंजी महानगरपालिका आयुक्तांनी इचलकरंजी शहर आपत्ती व्यवस्थापन समितीच्या पुर्वतयारी आढावा बैठकीचे आयोजन केले होते.
बैठकीच्या प्रारंभी उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनी महानगर पालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या पुर्वतयारी बाबतची सविस्तर माहिती विषद केली. आयुक्त यांनी मागील महापुराची माहिती घेऊन तशी परिस्थिती निर्माण झाल्यास कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करणेच्या सूचना सर्व संबंधित घटकांना देऊन शहरातील सर्व शासकीय यंत्रणा सामाजिक तथा स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून संभाव्य महापुराच्या परिस्थितीस सामोरे जावुया असे प्रतिपादन केले.
त्याचबरोबर पुर परिस्थिती निर्माण झालेस सर्वच विभागांची आपत्कालीन व्यवस्थापन अंतर्गत पथके सतर्क ठेवावीत,२४ तास आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाकडील यंत्रणा कार्यान्वित राहील याची दक्षता घ्यावी, सर्पदंश, श्वानदंश यावरील लसीचा पुरेसा साठा उपलब्ध करून ठेवावा, औषध फवारणी,फॉगिंग यासाठी आवश्यक असलेला केमिकलचा साठा पुरेसा उपलब्ध करून ठेवावा अशा महत्त्वपूर्ण सुचना देवुन सर्वच शासकीय यंत्रणांनी एकमेकांशी समन्वय साधून काम करावे अशा सूचना आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांनी सर्व शासकीय यंत्रणांना दिल्या.
याप्रसंगी उपविभागीय अधिकारी मोसमी बर्डे चौगुले, पोलिस उप अधीक्षक समीर साळवे, उपायुक तैमूर मुलाणी , अप्पर तहसीलदार मनोजकुमार ऐतवडे, सहा आयुक्त केतन गुजर, महावितरणचे कार्यकारी अभियंता प्रशांत राठी, इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ नंदकुमार बनगे, सहायक पोलीस निरीक्षक राजीव पाटील, सहायक पोलीस निरीक्षक पुनम माने, पोलीस उपनिरीक्षक माळी, पाटबंधारे विभागाचे वैभव कोळेकर, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ आर.बी.जंगम, बी.एस.एन. एल. चे मनोजकुमार आवळे, इचलकरंजी आगार प्रमुख सागर पाटील, कामगार अधिकारी विजय राजापुरे,आरोग्य अधिकारी डॉ. सुनिलदत्त संगेवार, शहर अभियंता संजय बागडे, कार्यकारी अभियंता सुभाष देशपांडे, विद्युत अभियंता संदिप जाधव, अग्निशमन अधिकारी सौरभ साळुंखे, मिळकत पर्यवेक्षक सचिन पाटील, जनसंपर्क अधिकारी नितिन बनगे, आपत्कालीन विभागाचे संजय कांबळे उपस्थित होते.