इचलकरंजी महानगरपालिका आता तरी जागे होणार का ..?



प्रेस मीडिया लाईव्ह :

 इचलकरंजी महानगरपालिका आता तरी जागे होणार का ..? असा प्रश्न सर्वांना पडला आहे . छत्रपती शिवाजी महाराज रिक्षा मित्र मंडळ यांनी रस्त्यावरती  पडलेला मोठा खड्डा  व त्याचा फोटो काढून  या खड्ड्या मुळे अपघात होण्याची शक्यता आहे , अपघाताने कोणाचा तरी जीव जाऊ नये म्हणून हा अनोख्या पद्धतीने खड्ड्याचे स्वागत करून आंदोलन केले आहे . 

या बाबत संबंधित खात्याने याची तातडीनं दखल घेऊन हा खड्डा ताबडतोब पॅचवर्क करून नागरिकांना व एसटी  बस सुरक्षित पणे आत  यावी व बाहेर  जाण्यासाठी ताबडतोब  खड्ड्यांचे  काम करावे अन्यथा या बाबत मोठे आंदोलन करावे लागेल याची दखल संबंधित प्रशासनाने  घ्यावी असा इशारा  रिक्षा चालक-मालक संघटनेने दिला आहे. 

Post a Comment

Previous Post Next Post