संभाव्य आपत्कालीन परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्या कडुन अग्निशमन विभागांचा आढावा

 


प्रेस मीडिया लाईव्ह : 

इचलकरंजी :   संभाव्य आपत्कालीन परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे हे बैठकीद्वारे महानगर पालिकेच्या विविध विभागांच्या कामकाजाची माहिती जाणून घेत आहेत .आज या अनुषंगाने महानगरपालिकेच्या अत्यंत महत्त्वाचा असलेला वाहन आणि अग्निशमन विभागाची बैठक घेऊन आढावा घेतला. 

          महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या बळकटीकरण करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत  नवीन २ अग्निशमन वाहन (फायर फायटर) खरेदी करणेसाठीचे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत त्याचा पाठपुरावा करून तातडीने सदर प्रस्तावास मान्यता मिळणेसाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे  आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांनी सांगितले.

महानगरपालिकेच्या मंजूर आकृतीबंधानुसार फायरमन आणि वाहन चालक इत्यादी पदे भरणेसाठी आवश्यक ती कार्यवाही करणेच्या सुचना संबंधितांना दिल्या. तसेच महानगरपालिकेच्या सर्व प्राथमिक शाळेत अग्निशमन उपकरणे बसविणेचे आदेश देऊन शालेय विद्यार्थ्यांना अग्निशमन यंत्रणेविषयी प्रात्यक्षिकांचे सादरीकरण, आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याचे प्रशिक्षण,प्रथमोपचार करणे याविषयीची माहिती देणेची सुचना दिल्या. त्याचबरोबर अग्निशमन दलाच्या जवानांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्यांच्या साठी सुद्धा आवश्यक ते प्रशिक्षण अथवा मॉकड्रिलचे आयोजन करणेच्या सुचनाही अग्निशमन अधिकारी सौरभ साळुंखे यांना दिल्या.

    सदर बैठकीस अग्निशमन अधिकारी सौरभ साळुंखे, वाहन अधीक्षक राजेंद्र मिरगे, मेकॅनिक भागोजी निर्मळे, अनिल कांबळे, प्रशांत आरगे आदी उपस्थित होते.


        

Post a Comment

Previous Post Next Post