जामा सोशल फाऊंडेशन या संस्थेच्या वतीने विध्यार्थ्यांचा सत्कार

 


प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुसा खलिफा :

इचलकरांजी  जामा सोशल फाऊंडेशन या संस्थेच्याया संस्थेच्या वतीने  2023 मध्ये दहावी आणि बारावी पास तसेच ग्रॅज्युएशन पुर्ण केलेल्या विध्यार्थ्यांचा सत्कार करणेत आला.

      कार्यक्रमाची सुरवात मौलाना आशिक ईलाही शेख यांनी पवित्र कुराणचे पठणाने केली. अश्फाक गवंडी यांनी पाहुण्यांचे व  उपस्थितांचे  स्वागत केले.असलम शेख यांनी उपस्थीत पाहुण्यांची ओळख करून दिली.  तसेच टॉपर्स कोचींग क्लासचे डॉ. मुजावर सर,  प्रतापजी होगाडेसाहेब, जामे मस्जिदचे उपाध्यक्ष सादिकभाई शेख, सेक्रेटरी अ.जब्बार कक्केरी ,खजिनदार इकबाल अरब ,इंजीनियर सय्यद गफारी,सादिक कोतवालसर, असलम कोतवाल,ॲड.नजीर शिकलगार,  मुसा खलीफा,फिरोज बागवान  यांचे हस्ते यशस्वी विध्यार्थ्यांचा सत्कार करणेत आला.शकील रमदान सर यांनी *जामा सोशल फाऊंडेशन* च्या कार्याचा आढावा घेतला.डॉ.मुजावर सरांनी आपल्या मनोगतामध्ये विध्यार्थ्यांना मोबाईलच्या आभासी जगातुन बाहेर पडण्यासंबधी सुचना केल्या.सादिकभाई शेख,इकबाल अरब,सय्यद गफारी यांनीही आपले *जामा सोशल फाऊंडेशन* च्या समाजपयोगी कार्यास नेहमी पाठींबा राहील असे मनोगत व्यक्त केले. शेवटी नजीर काले यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानुन कार्यक्रम संपल्याचे जाहीर केले.

सदर कार्यक्रमास वाहीद पटवेगार, असलम शेख, अशफाक गवंडी, अलनसीर शेख, शकील रमदान, नजीर काले,शब्बीर शेख, मुजीब तराळ,निसार पटवेगार, मुबारक कक्केरी,रफिक बागवान व इतर हजर होते .

Post a Comment

Previous Post Next Post