इचलकरंजी महानगरपालिका आणि इनरव्हील क्लब ऑफ इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने भगतसिंग उद्यान येथे दुर्मिळ आणि औषधी रोपांचे वृक्षारोपण



प्रेस मीडिया लाईव्ह : 

    इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने ' माझी वसुंधरा ' अभियान अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.या अनुषंगाने इचलकरंजी महानगरपालिका उद्यान विभाग आणि इनरव्हील क्लब ऑफ इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने शहिद भगतसिंग उद्यान  येथे   कडुनिंब जातीच्या १०० रोपांचे  तसेच दुर्मिळ आणि औषधी गुणधर्म असलेल्या रोपांचे वृक्षारोपण करणेत येवुन सदर ठिकाणचे अमृत वाटिका असे नामकरण करणेचा कार्यक्रम संपन्न झाला. 

     यावेळी वृक्ष अधिकारी संपत चव्हाण, उद्यान पर्यवेक्षक सुनिल बेलेकर, इनरव्हील क्लब ऑफ इचलकरंजी च्या महिला प्रतिनिधी श्रद्धा झंवर, स्मिता कुलकर्णी, आशा छापरवाल, वैशाली लोखंडे तसेच उद्यान विभागाकडील दिलीप मगदुम, मनोज खंदारे,महेश बुचडे, हमीद शेख, मनोज कांबळे, दशरथ हत्तीकर  यांचेसह मॉर्निंग वॉक साठी येत असलेले नागरिक उपस्थित होते.


        

Post a Comment

Previous Post Next Post