प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने आज सोमवार दि. ३ जुलै रोजी वीर शिवा काशिद यांच्या पुण्यतीथी निमित्त ( तिथीनुसार) महानगरपालिका सभागृहामध्ये त्यांच्या प्रतिमेस नुतन उपायुक्त तैमूर मुलाणी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी प्र.उपायुक्त केतन गुजर,कामगार अधिकारी विजय राजापुरे, माजी नगरसेवक सयाजी चव्हाण, सुनील इंगळे, भारत मर्दाने, बाबुराव जाधव, जयसिंग संकपाळ, मारुती काशीद, विनायक चव्हाण, सदाशिव चव्हाण, आनंदा कीर्तने, विनोद सपकाळ, संजय सपकाळ, प्रवीण जाधव, संतोष म्हेत्रे आदिंसह शहरातील नाभिक समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते.