प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी शहरातील नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करणे यासाठी नागरिक / अभ्यांगत (पुर्व नियोजित भेटी व्यतिरिक्त ) महानगरपालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांना थेट भेटण्यासाठी आठवड्यातील प्रत्येक सोमवार, बुधवार आणि शुक्रवार दुपारी ३.३० ते ५.३० अशी वेळ निश्चित करणेत आलेली आहे. यावेळी भेटीसाठी आलेल्या अभ्यांगतानामध्ये वयोवृद्ध तसेच जेष्ठ व्यक्ती असल्यास त्यांना भेटीसाठी प्राधान्य देणेत येणार आहे.
त्याचबरोबर सदर दिवशी नमुद वेळी सर्व विभाग प्रमुख यांनी सुद्धा मुख्यालयात उपस्थित राहुन भेटीसाठी आलेल्या नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करणेस प्राधान्य द्यावे अशा सुचनाही मा.आयुक्त यांनी सर्व विभाग प्रमुख यांना दिल्या आहेत.
सदर भेटीच्या नियोजित वेळी काही अपरिहार्य कारणास्तव मा.आयुक्त कार्यालयात अनुपस्थित असल्यास मा.उपायुक्त (मुख्यालय) यांचेकडून नागरिक अभ्यांगताना भेटीसाठी वेळ राखीव ठेवुन त्यांच्या समस्यांचे
निराकरण करणेत येणार आहे.