नुतन आयुक्त तथा प्रशासक प्रकाश दिवटे
प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी महानगरपालिकेचे नुतन आयुक्त तथा प्रशासक पदाचा कार्यभार मा. ओमप्रकाश दिवटे यांनी आज शुक्रवार दि.७ जुलै रोजी स्विकारला . त्यानंतर मा.आयुक्त यांनी महानगरपालिकेच्या विविध विभाग प्रमुखांच्या समवेत बैठकीचे आयोजन केले होते.
सदर बैठकीत त्यांनी तत्कालीन आयुक्त सुधाकर देशमुख यांनी प्रशासकीय कामकाजाला लावलेल्या शिस्तीप्रमाणेच कामकाज सुरू ठेवण्याच्या सूचना दिल्या. त्याचबरोबर माझं घर,माझा परिसर, आणि माझं शहर स्वच्छ आणि सुंदर कसं राहील यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे आणि हा दृष्टिकोन ठेवून प्रत्येक विभाग प्रमुखांनी काम करावे असे आवाहन केले.
शहराची स्वच्छता आणि सर्वच थरातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावेत.आपणांस प्राप्त अधिकाराचा योग्य वापर केल्यास सर्व प्रकारच्या नागरी सुविधा योग्य पद्धतीने पुरविल्या जातात तसेच आपल्यावर टाकलेल्या जबाबदारीला न्याय द्यावा.कामासाठी येणाऱ्या नागरिकांचे काम तातडीने पूर्ण व्हावे एवढीच माझी अपेक्षा असुन महानगरपालिका अधिकारी कर्मचारी हे एक कुटुंब आहे असे समजून आपण सर्वांनी कामकाज करुया आणि या कुटुंबाचा प्रमुख म्हणून आवश्यक त्या *पायाभूत सुविधा, स्वच्छता, रस्ते, पर्यावरण रक्षण तसेच नागरीकांना नागरी सुविधा* *पुरविण्यासाठी माझी जबाबदारी पुर्ण क्षमतेने पार पाडणार* असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या प्रसंगी उपायुक्त डॉ प्रदीप ठेंगल, उपायुक्त तैमूर मुलाणी यांचे सह महानगरपालिकेचे विविध विभाग प्रमुख, अधिकारी उपस्थित होते.
जनसंपर्क अधिकारी
इचलकरंजी महानगरपालिका