इचलकरंजी मनपा क्षेत्रातील मिळकतींना लागु करण्यात आलेली शास्ती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या धर्तीवर रद्द करावी

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन


प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुसा खलिफा : 

 मुंबई येथे काल कोल्हापूर शिवसेना जिल्हाप्रमुख  श्री रविंद्र माने  यांनी महाराष्ट्राचे  मुख्यमंत्री नामदार श्री एकनाथ शिंदे  यांची भेट काल भेट घेऊन  इचलकरंजी महानगरपालिका क्षेत्रातील मिळकतींना लागु करण्यात आलेली शास्ती पिंपरी चिंचवड  महानगरपालिकेच्या धर्तीवर रद्द करण्यात यावी या संदर्भात बैठक लावावी असे निवेदन देण्यात आले . 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांनी यासंदर्भात लवकर बैठक लावली जाईल असे सांगितले यावेळी मा उपनगराध्यक्ष श्री रवी  रजपूते नियोजन मंडळ सदस्य प्रतापराव देशमुख उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post