प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी दिनांक 25, : भारतीय जनता पार्टी इचलकरंजी व महिला बाल विकास विभाग यांच्या वतीने सरकारच्या बाल संगोपन योजनेचे एक दिवसीय शिबीर भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार सुरेशराव हाळवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजप शहर तथा संजय गांधी निराधार योजना समिती अध्यक्ष अनिल डाळ्या यांच्या नेतृत्वाखाली जुनी पालिका येथील जुन्या कौन्सिल हॉल मध्ये संपन्न झाले .
यावेळी सुरुवातीला महिला बालकल्याण विभागातील अधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले आपल्या आपल्या प्रास्ताविक भाषणा मध्ये मा अनिल डाळ्या यांनी या बाल संगोपन योजनेची माहिती देत यापूर्वी बाल संगोपन योजने च्या लाभार्थ्यांना दरमहा ,1100 रुपये चा लाभ मिळत होता परंतु भाजपा शिवसेना युतीचे सरकार आल्यानंतर या योजनेचा लाभार्थ्यांना 2250/- दरमहा भरघोस वाढ केलेने जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा आवाहन केले तसेच मोदी सरकारच्या विविध योजनेची माहिती देऊन नागरिकांना भाजप युती सरकारच्या विविध लोकप्रिय योजनांची माहिती देऊन नागरिकांना सर्व योजनांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले व या योजनेचेसह विविध योजनांचे शिबिर प्रत्येक वार्डा वार्डात विभागात राबवले जाणार असल्याची ही माहिती दिली .
यावेळी महिला बालकल्याण चे अधिकारी मा महेंद्र कांबळे व श्रीमती ज्योती भोई यांनी या योजनेबद्दल कागदपत्रे व या बाल संगोपन योजने अनुषंगाने महिला बालकल्याण मार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांची माहिती देऊन शिबिरास हजर असणाऱ्या नागरिकांना मार्गदर्शन केले यावेळी ३५० लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली
बाल संगोपन योजनेअंतर्गत नोंदणी करण्यात आलेल्या ज्या मुलांना आई किंवा वडील नसतील किंवा मुलांना आई व वडील दोन्ही ही नसतील अशा विविध घटकातील ० ते १८ वयोगटातील बालकांना बालसंगोपन योजनेचा लाभार्थ्यांना एका कुटुंबातील दोन किंवा जास्त मुलांना ही लाभ दिला जातो. एका मुलासाठी प्रतिमहिना २२५०/- रुपये (एका वर्षाला २७०००/- रु मिळतात) १८ वर्षे पूर्ण होईपर्यंत दर महिन्याला अनुदानित रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार. या योजनेचा इचलकरंजी विधानसभा परिसरातील नागरिकांनी लाभ मिळणार आहे. या एकदिवसीय शिबिराचे संयोजन संदीप घोरपडे यांनी केले शिबिर सांगता वेळी भाजपा शहर महिला अध्यक्ष सौ पूनम जाधव यांनी सर्वांचे आभार मानले यावेळी यावेळी भाजपा महिला जिल्हा उपाध्यक्ष अश्विनी कुबडगे, नीता भोसले प्रदीप मळगे, उमाकांत दाभोळे,प्रमोद बचाटे सचिन माळी प्रवीण रावळ प्रमोद पाटील संजय नागुरे भाजप कार्यकर्त्यांसह लाभार्थी पालक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते