प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांनी आज सोमवार दि.१७ जुलै रोजी महानगरपालिकेच्या सर्व विभाग प्रमुखांच्या समवेत बैठकीचे आयोजन केली होती.
सदर बैठकीत मा.आयुक्त यांनी सर्व विभाग प्रमुख यांना विषयानुरूप विविध सुचना दिल्या.यामध्ये प्रामुख्याने आपण ज्या ठिकाणी काम करतो ते ठिकाण स्वच्छ ठेवणे आवश्यक असल्याने महानगरपालिका कार्यालयातील प्रत्येक विभाग प्रमुखांनी महिन्यातुन एक वेळ आपल्या कार्यालयाची स्वतः स्वच्छता करावी असे आवाहन केले. जेणेकरुन आपणांस तसेच महानगरपालिकेत कामासाठी येणाऱ्या नागरिकांचे मन प्रसन्न होईल.
सन्माननीय खासदार, आमदार तसेच लोकप्रतिनिधींचे मागणी नुसार आवश्यक ती कार्यवाही तातडीने करावी.त्याचबरोबर शासन स्तरावरून येणाऱ्या निर्देशानुसार नियोजित वेळेपुर्वी प्रस्तावित करावे, महानगरपालिका संकेतस्थळावर प्रसिद्ध करुन जास्तीत जास्त माहिती सर्वांसाठी उपलब्ध करून देण्यात यावी, दिंव्यांग तसेच महिला बाल कल्याण यासाठी धोरण ठरवुन आवश्यकतेनुसार प्रस्ताव सादर करावेत आणि तत्कालीन आयुक्त सुधाकर देशमुख यांनी पारित केलेल्या सर्व आदेशांचे तंतोतंत पालन करावे अशा महत्त्वपूर्ण सुचना देवुन *आपण सर्वांनी मिळून
इचलकरंजी शहरवासीयांच्या आयुष्यात सुखावह बदल झाल्याची भावना प्रत्येक* *नागरिकांच्या मनात निर्माण झाली पाहिजे असे कामकाज करुया* असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांनी केले.
या बैठकीस उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांचेसह महानगरपालिकेचे सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.