संभाव्य महापूराचा व अति वृष्टीचा सामना करणे साठी इचलकरंजी महानगरपालिकेची आपत्कालीन यंत्रणा सुसज्ज

 दि.१०/७/२०२३ प्रशासक तथा आयुक्त ओमप्रकाश दिवटे.




प्रेस मीडिया लाईव्ह :

    कोल्हापूर जिल्ह्यासह इचलकरंजी शहरामध्ये आलेल्या मागील काही वर्षाच्या महापुराच्या  पार्श्व भूमीवर जिल्हा प्रशासनाच्या सुचनेनुसार संभाव्य महापुराचा व अतिवृष्टीचा सामना करणेसाठी इचलकरंजी महानगरपालिकेची आपत्कालीन यंत्रणा सुसज्ज ठेवणेचे आदेश प्रशासक तथा आयुक्त ओमप्रकाश दिवटे  यांनी दिले होते.

  या अनुषंगाने आज सोमवार दि. १० जुलै रोजी नव्याने खरेदी केलेल्या फ्लोटिंग डॉकचे पुजन आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्या हस्तेकरणेत आले.तसेच इचलकरंजी महानगरपालिकेच्या आपत्कालीन विभागा मार्फत पंचगंगा


नदी घाट येथे प्रात्य क्षिकाचे (मॉकड्रिल) सादरीकरण  करणेत आले. त्याच बरोबर आपत्कालीन विभागा कडे उपलब्ध असलेल्या साधन सामग्रीची सविस्तर माहिती आपत्कालीन विभागाचे संजय कांबळे यांनी प्रात्यक्षिकासह दिली.    यामध्ये  यांत्रिक बोट , साधी फायबर बोट,स्टिल कटर,वुड कटर ,लाईफ जॅकेट, रिफ्लेक्टीव्ह जॅकेट, लाईफ रिंग, दोर, मेगा फोन, गळ, ट्यूब, इमर्जन्सी लॅम्प, स्नेक हँगर,टॉर्च, स्लायडिंग शिडी , बायनाक्युलर  ईत्यादी साहित्य तसेच फायर बुलेट, फायर फायटर, रुग्ण वाहिका, हायड्रोलिक प्लॅटफार्म,औषध फवारणी ट्रॅक्टर, सक्शन ट्रॅक्टर याचा  समावेश आहे. 

            यावेळी सर्व यंत्रसामग्री सुस्थितीत असले बाबतची माहिती  प्रशासक तथा आयुक्त ओमप्रकाश दिवटे  यांनी घेवुन महापुराची परिस्थिती निर्माण झाल्यास सदर परिस्थिती यशस्वी पणे हाताळण्यासाठी त्याचे अचूक नियोजन करणेच्या सुचना दिल्या त्याचबरोबर इचलकरंजी शहरवासीयांना संभाव्य महापुराच्या परिस्थितीत शाश्वती निर्माण व्हावी यासाठी आजचे मॉक ड्रिलचे (प्रात्यक्षिक) आयोजन करणेत आलेचे स्पष्ट केले.

        याप्रसंगी उपायुक्त तैमूर मुलाणी, सहा आयुक्त केतन गुजर, कार्यकारी अभियंता संजय बागडे, सुभाष देशपांडे,आरोग्य अधिकारी डॉ. सुनिलदत्त संगेवार, लेखापरीक्षक दिलीप हराळे, अग्निशमन अधिकारी सौरभ साळुंखे,वाहन अधिक्षक राजेंद्र मिरगे, मिळकत पर्यवेक्षक सचिन पाटील, जनसंपर्क अधिकारी नितिन बनगे,कनिष्ठ अभियंता अभय शिरोलीकर, बाजी कांबळे,उद्यान पर्यवेक्षक सुनिल बेलेकर, महाराष्ट्र सुरक्षा बल पर्यवेक्षक उमाजी कणसे, स्वच्छता निरीक्षक सुरज माळगे, वरद विनायक बोट क्लबचे गणेश बरगाले , यांत्रिक बोट जवान, फायर फायटर जवान, ,तेजोनिधी  रेस्क्यू फोर्सचे सदस्य, पोलिस बॉईजचे सदस्य, व्हाईट आर्मीचे शाहीर जावळे, लक्ष्मी प्रोसेसची रुग्णवाहिका तसेच महापुराच्या काळात महानगरपालिका प्रशासनास अत्यंत महत्त्वपुर्ण असे सहकार्य करणारे शहरातील पट्टीचे पोहणारे , शहरातील प्राणी मित्र  उपस्थित होते.


  

Post a Comment

Previous Post Next Post