EPS - 95 संघटनेच्या, प्रांतिक समन्वयक महाराष्ट्र पदी सुरेश केसरकर यांची निवड

 



प्रेस मीडिया लाईव्ह :

बुलढाणा (वार्ताहर) : -

         कोल्हापूर जिल्ह्यातील जेष्ठ कामगार नेते व सामाजिक कार्यकर्ते सुरेश केसरकर यांची EPS - 95 संघटनेच्या, "प्रांतिक समन्वयक महाराष्ट्र" पदी निवड करण्यात आलेचे, संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांचेवतीने कळविणेत आले आहे. सध्या सुरेश केसरकर हे राज्य गुणवंत कामगार असोसिएशन, महाराष्ट्रच्या अध्यक्षपदी कार्यरत आहेत. त्यामाध्यमातून त्यांचे जिल्हा, राज्य व देश पातळीवर भरीव कार्य सुरु आहे. सेवानिवृत्त मंडळींना भरीव पेन्शन मिळावी यासाठी त्यांनी देशाचे पंतप्रधान, देशाचे अर्थ मंत्री, देशाचे कामगार मंत्री, राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे अर्थ मंत्री, राज्याचे कामगार मंत्री तसेच जिल्ह्यातील खासदार व आमदार महोदय आदींना सातत्याने पत्रव्यवहार केले आहेत.

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ व विविध संस्थांच्या माध्यमातून शासनाच्या सर्व योजना व उपक्रम, कामगार मेळावे, कामगार शिबिरे, महिला प्रशिक्षण वर्ग, बाल संस्कार वर्ग, योगा वर्ग, वृक्षारोपण, नैसर्गिक आपत्तीच्या वेळी पूरग्रस्तांना अन्नधान्य वाटप, रक्तदान शिबिरे, पल्स पोलिओ लसीकरण, एड्स विषयक जनजागृती, हेल्पर्स ऑफ द हॅंडीकॅप्ड, हर्षनील मानव सेवा केंद्र, चेतना अपंगमती संस्था, बाल करूणालय आदी. सेवाभावी संस्थांना स्वतः व मित्रमंडळींच्या माध्यमातून सातत्याने दातृत्वाच्या भावनेने सढळ हस्ते मदत करीत असतात. 

जून २०२३ मध्ये पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय तसेच  सेवाभावीवृत्तीने वैशिष्ठयपूर्ण कार्य केल्याबद्दल, नुकतेच देशाची राजधानी दिल्ली येथे संसद भवन मध्ये झालेल्या शानदार सत्कार समारंभ कार्यक्रमावेळी, भारताचे सामाजीक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांच्या हस्ते व जागतीक पातळीवरील मान्यवरांच्या उपस्थितीत, राष्ट्रीय नागरी एवं पर्यावरण संरक्षण विभागाच्यावतीने दिला जाणारा "राष्ट्रीय पर्यावरण पुरस्कार- २०२३" देऊन सन्मानित करण्यात आले आहे. सुरेश केसरकर हे जिल्ह्यातील विविध चळवळीमध्ये सातत्याने भरीव कार्य करीत असून, अनेक संस्था व संघटनांच्या पदांवरती समाजाचे कांहीतरी देणे लागतो या उदात्त हेतूने सक्रियपणे कार्यरत आहेत. सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतिक, कला - क्रीडा, संघटना व आस्थापना तसेच समाजातील वंचित व उपेक्षित घटकांसाठी त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अवयवदान - देहदान चळवळीचा प्रचार व प्रसार मोठ्या प्रमाणात होवून याबाबत जनजागृत्ती व्हावी, यासाठी ते राज्य व जिल्हा पातळीवर विविध संस्थांच्या माध्यमातून सक्रियपणे कार्यरत आहेत.  कवी, साहित्यिक, लेखक, शाहीर आदींचे लेखन व त्यांच्या लेखनाला व्यासपीठ मिळावे यासाठी, धर्मनिरपेक्ष चळवळीमध्ये त्यांचे सातत्याने योगदान असते. सामाजीक कार्यकर्त्यांना प्रोत्साहन मिळावे व त्यांचेकडून मोठ्या प्रमाणात देश सेवा घडावी यासाठी, संबंधिताचा यथोचित मान - सन्मान करून त्यांना देशसेवेसाठी प्रोत्साहित करीत असतात. 

संघटित व असंघटित कामगार, बांधकाम कामगार, कंत्राटी कामगार, औद्योगिक कामगार यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात ते सातत्याने कामगार आयुक्त, जिल्हाधिकारी, राज्य शासन व केंद्र सरकारला पत्रव्यवहार व त्या अनुषंगाने पाठपुरावा करून कामगार वर्गाला न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असतात. आजअखेर त्यांना जिल्हा, राज्य व राष्ट्रीय पातळीवरचे अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. शासनाच्या सर्व योजना व उपक्रमांची माहिती जिल्ह्यातील सर्व घटकांना व्हावी व त्याचा लाभ समाजातील वंचित व उपेक्षित घटक यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण काम सातत्याने सहकाऱ्यांच्या मदतीने करीत आहेत.  राज्यातील बोगस नोकर भरती प्रकरण, अवैध धंदे तसेच इतर अनेक बाबींवरती प्रभावी पत्रकारीतेच्या माध्यमातून आवाज उठवून, आक्रमक व अभ्यासू कार्यप्रणालीव्दारे ते शासनाला सहकार्य करीत असतात. कोरोनाच्या काळात स्वतः पुढाकार घेऊन, स्थानिक व परप्रांतीय कामगार वर्गाला केलेल्या सामाजिक कार्याच्या जोरावर त्यांना अनेक संस्थांनी "कोरोना योद्धा" हा बहुमान देवून सन्मानीत केले आहे. सुरेश केसरकर हे मा. जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्या शिफारशीनुसार सन २००४ पासून तहयात विशेष कार्यकारी अधिकारी या पदावरती कार्यरत आहेत. त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण कार्याची दखल घेत मार्च २०२३ मध्ये त्यांचा मान्यवरांच्या हस्ते, कोल्हापूर मध्ये जाहीर नागरी सत्कार देखील करण्यात आलेला आहे.

या प्रसंगी आमच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी संवाद साधला असता, सदर निवडीमुळे आपल्या जबाबदारीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे सांगून जिल्हा, राज्य व देश पातळीवर सेवानिवृत्त जेष्ठ कामगारांना भरीव स्वरूपात निवृत्ती वेतन मिळावे, तसेच जेष्ठांना वार्धक्यामुळे उद्भवणाऱ्या समस्यांना सामोरे जाण्यासाठी राज्य व केंद्र शासनाच्यावतीने मिळणाऱ्या सर्व सोई - सुविधा विना अट व त्वरीत मिळाव्यात, यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग, नगर विकास विभाग, गृह विभाग, गृहनिर्माण विभाग, महसूल विभाग, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, शालेय शिक्षण विभाग, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, समाज कल्याण आयुक्तालय, विधी व न्याय विभाग, सांस्कृतिक कार्य व पर्यटन विभाग, सामान्य प्रशासन विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग, सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, वित्त विभाग, कौशल्य विकास विभाग, उद्योग व कामगार/ ग्राम विकास/नगर विकास विभाग, विधी व न्याय आदी. शासन विभागाकडे परीपत्रकानुसार पाठपुरावा करून, सर्व जेष्ठांसाठी भरीव कामगिरी करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

या निवडीसाठी EPS - 95 संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत, राष्ट्रीय महासचिव विरेंद्रसिंग राजावत, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष स. ना. आंबेकर, पश्चिम भारत संघटक सुभाषराव पोखरकर, महाराष्ट्र कार्याध्यक्ष कमलाकर पांगारकर, मराठवाडा अध्यक्ष दादाराव देशमुख, अच्युतराव माने, बाबासाहेब गरड, वासुदेव वेदपाठक, आंदळे आदी. प्रमुख पदाधिकार्‍यांचे सहकार्य लाभले. जिल्ह्यातील सेवा निवृत्त पेन्शनधारक व जेष्ठ नागरिकांना, सुरेश केसरकर यांच्या निवडीमुळे आनंद झालेचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.

तसेच या निवडीमुळे जिल्हा तसेच राज्यभरातून त्यांच्यावरती कौतुकाचा तसेच अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post