यह पब्लिक है सब जानती है सही क्या है गलत क्या है सब पहचानती है
प्रेस मीडिया लाईव्ह :
अकोला प्रभाग क्रमांक 1 मधील असंख्य समस्यांना घेऊन नारी शक्ति सेवा फाउंडेशन गेल्या किती दिवसां पासूण संघर्ष करत होता या प्रभागात रस्ते नसल्या मुळे पाऊसाळयात येथील नागरीकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे , रस्ते नसल्यामुळे एखादी गर्भवती महिला आजारी पडल्यास त्याला दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी आटो रिक्शा सुद्धा येत नाही , तसेच शाळकरी मुलांना शाळेला जाणे कठीण होते , त्याच प्रमाणे जर कोणाचा मृत्यू झाला तर त्याला स्मशान भूमि पर्यंत पोहचवणे सुद्धा कठीण होते .
या सगळया बाबींचा विचार करून नारी शक्ति सेवा फाउंडेशनने मनपा आयुक्त तसेच जिल्हाधिकारी व नगर विकास मंत्रालयात तक्रारी करून पाठ पुरावा केला , या केलेल्या पाठपुराव्याची गंभीरतेने दखल घेऊन महानगरपालिकेने कॉंक्रेटीकरण रस्त्याचे काम सुरु केले आहे अजूण ही रस्ते, नाल्या व नालेचे काम बाकी आहे .
या करीता या प्रभागातील शेकडो महिलांचे स्वाक्षरी घेऊण सुमय्या अली संस्थापक अध्यक्ष नारी शक्ति सेवा फाउंडेशन यांनी मनपा आयुक्तची भेंट घेऊण इतर समस्या त्यांच्या समोर मांडल्या तेव्हा मनपा आयुक्त यांनी जसा जसा निधि येईल तसे तसे बाकी समस्यांचे निवारण सुद्धा करणयात येईल असे आश्वासन दिले , परंतु ज्या लोकांनी ५ वर्ष या भागात काहीच काम केले नाही ते लोक या कामाचा श्रेय घेणयाचा प्रयत्न करत आहे परंतु त्यांना हे माहित नाही यह पब्लिक है सब जानती है सही क्या है गलत क्या है सब पहचानती है