'प्रतिमा उत्कट रंग कथा २३’ चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन

ज्ञान प्रबोधिनी प्रशाला माजी विदयार्थी मंडळाचे आयोजन


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : ज्ञान प्रबोधिनी प्रशाला माजी विदयार्थी मंडळाच्या - कला आणि संस्कृती विशेष उद्दिष्ट गटाने  ‘आर्टिस्ट कट्टा ‘ या संस्थेच्या सहकार्याने   आयोजित केलेल्या   'प्रतिमा उत्कट – रंग कथा २३ ‘ या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ कला दिग्दर्शक श्याम भुतकर यांच्या  हस्ते  झाले. भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेचे विश्वस्त प्रदीप रावत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

ज्येष्ठ चित्रकार मुरली लाहोटी,मोहनराव गुजराथी, सुभाषराव देशपांडे,मिलिंद संत, अमित वझे,अस्मिता अत्रे, अमिता पटवर्धन, डॉ. समीर दुबळे, चेतना गोसावी, श्रीनिवास देसाई  इत्यादी मान्यवर उपस्थित होते. उद्घाटनानंतर श्याम भूतकर यांच्याशी अमित वझे, अस्मीता अत्रे यांनी संवाद साधला.

'प्रतिमा उत्कट- रंगकथा २३'  हे चित्र प्रदर्शन दि.८ ते ११ जून २०२३ या काळात बालगंधर्व कला दालन, पुणे सकाळी १० ते संध्याकाळी ८ वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले राहील. या प्रदर्शनाचे वैशिष्टय़ म्हणजे यामधे ८० हून अधिक कलाकारांनी विविध विषयांवर विविध माध्यमातून काढलेली चित्रे प्रदर्शित केली  आहेत.दुसरे वैशिष्टय़ म्हणजे हे कलाकार वय वर्षे १० ते ८५ अशा विविध वयोगटातील आहेत. तसेच विशेष नमूद करण्यासारखी बाब म्हणजे यातील काही कलाकार नागरी वस्तीतील आहेत तर काही दिव्यांग माजी सैनिक आहेत.

याशिवाय प्रत्येक दिवशी प्रदर्शनाबरोबरच अनेक मान्यवर कलाकारांची  प्रात्यक्षिके आणि संवाद सत्रे आयोजित केलेली आहेत. त्यात ९ जून रोजी सकाळी साडे दहा वाजता सुरभी गुळवेलकर-साठे यांचे प्रात्यक्षिक, सायंकाळी साडे पाच वाजता चंद्रमोहन कुलकर्णी यांच्याबरोबर संवाद, १० जून रोजी सकाळी साडे दहा वाजता दीपककुमार शर्मा यांचे प्रात्यक्षिक, सायंकाळी साडे पाच वाजता मिलिंद मुळीक आणि मंजिरी मोरे यांच्याबरोबर संवाद, ११ जून रोजी सकाळी साडे दहा वाजता सायली भगली-दामले यांचे प्रात्यक्षिक, सायंकाळी ४ वाजता डॉ मुक्ता अवचट-शिर्के यांचे प्रात्यक्षिक अशी विविध सत्रे होणार आहेत. ११ जून रोजी सायंकाळी ६ वाजता समारोप कार्यक्रम होणार आहे.

मुक्त व्हा, कलेचा आस्वाद घ्या : श्याम भूतकर

श्याम भूतकर म्हणाले, 'शिक्षणाला, कलेचा आनंद घेण्याला वयाचे बंधन नाही.आस्वाद घेण्यालाही बंधन नाही.

चित्र मनात घडत असतं. भिंतीवर लहानपणापासून कलेचा आविष्कार घडत असतो.  रंगांचे, रेषांचे ज्ञान नंतर येते. पण, आवड लहानपणापासून असली पाहिजे.कला जन्मत : पेरली जाते.

    ' आवडते ते कर ' अशी मूभा पालकांनी दिली , गणेश मंडळातून सजावटीतून आवड वाढत गेली.

चित्रकला हा गाभा कायम ठेऊन मी प्रवास सुरू ठेवला. कलेचे ज्ञान वाटता यायला हवा. मुक्तपणे रंगांशी खेळता आले, तर आवड वाढते. आपल्याला व्यक्त होण्याची भाषा म्हणजे चित्र होय.

प्रदीप रावत म्हणाले, ' कला ही प्रेरणा देणारी गोष्ट आहे.कलेच्या माध्यमातून जागतिक  आविष्कार झाला पाहिजे. त्यासाठी हे प्रदर्शन उपयुक्त ठरेल.


Post a Comment

Previous Post Next Post