प्रेस मीडिया लाईव्ह :
शिरोळ प्रतिनिधी:
श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आरोग्य केंद्रातील माजी लॅब टेक्निशियन व सध्या हातकणंगले तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय येथे कनिष्ठ सहाय्यक म्हणुन कार्यरत असलेले श्री फिरोज मोहम्मदअली हेतवडे यांना महाराष्ट्र शासन कोल्हापूर जिल्हा परिषदेचा मानाचा राजर्षी छत्रपती शाहू पुरस्कार नुकताच जाहीर झाला.
श्री फिरोज हेतवडे यांनी कोरोना काळात पंचायत समिती आरोग्य विभागात, तसेच हातकणंगले येथे तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात विशेष उल्लेखनीय तत्पर कार्य केले होते. श्री दत्त आरोग्य केंद्रात त्यांचे अभिनंदन करुन त्यांच्या भावी कार्यास सदिच्छा देण्यात आल्या. यावेळी आरोग्य केंद्राच्या चीफ मेडिकल ऑफिसर डॉ. रेखा शेरबेट मॅडम, मेडिकल ऑफिसर डॉ. गजानन चौगुले सर, मेडिकल ऑफिसर डॉ. प्रिया खाडे मॅडम, असिस्टंट मेडिकल ऑफिसर डॉ. कुमार पाटील , एक्स-रे टेक्निशियन श्री किरण भोसले, लॅब टेक्निशियन अजित बसणवर , नर्स इनचार्ज भोसले सिस्टर, सुधा सिस्टर, नम्रता सिस्टर, किशोर ब्रदर व इतर कर्मचारी उपस्थित होते.