राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त नांदणी येथे अभिवादन



प्रेस मीडिया लाईव्ह : 

नांदणी/ प्रतिनिधी:

लोकराजा, आरक्षणाचे जनक, स्त्री शिक्षणाच्या प्रसारासाठी राजाज्ञा काढणारे थोर समाजसुधारक, बहुजनांचा आधार छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त नांदणी येथे शिरोळ तालुका ओबीसी सोशल फाउंडेशन व शाहूप्रेमींच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित असणाऱ्या विविध मान्यवरांनी आपल्या मनोगतामध्ये त्यांच्या कार्याचा व विचारांचा जागर केला.

गांधी चौक येथे झालेल्या कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रारंभी प्रतिमापूजन करण्यात आले. सरपंच सौ. संगीता तगारे, उपसरपंच अजय कारंडे, गणेश बेकरीचे उद्योजक अण्णासाहेब चकोते, प्राध्यापक अण्णासाहेब क्वाणे, डॉ. सागर पाटील, प्रमोद शिंगाडे, आकाश कुरणे, विठ्ठल सूर्यवंशी, बाबासाहेब बागडी, दीपक कांबळे यांनी मनोगत व्यक्त करून राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याचा सविस्तर आढावा घेतला. अखिल भारतीय मानवी हक्क संघटनेचा सामाजिक कार्याबद्दलचा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल ग्रामपंचायत सदस्य दीपक कांबळे आणि बाहुबली पतसंस्थेच्या संचालक पदी निवड झाल्याबद्दल बाबासाहेब बागडी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन संजय सुतार यांनी केले तर आभार संजय गुरव यांनी मानले.

   यावेळी आदिनाथ कत्ते, महेश परीट, शितल उपाध्ये, किरण आंबी, डॉ. सिद्राम कांबळे, प्रकाश लठ्ठे, दादासो चौगुले, बापूसाहेब आंबी, बाबुराव ऐनापुरे, प्रकाश तगारे, सुनील क्षीरसागर, इमरान सनदी, मुरलीधर वायचळ, रमेश भुई, हर्षल कांबळे, अनिल क्षीरसागर, पांडुरंग भंडारे, सुनील मिरजकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post