प्रेस मीडिया लाईव्ह :
अकिवाट प्रतिनिधी:
शिरढोण येथील शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेले डॉ.कुमार रामगोंडा पाटील हे वैद्यकीय क्षेत्रातच नव्हे तर आध्यात्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, साहित्यिक व राजकीय क्षेत्रात आपली ओळख निर्माण केली आहे.
श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आरोग्य केंद्राचे सहाय्यक वैद्यकीय अधिकारी डॉ.कुमार पाटील यांनी अकिवाट येथील श्रावणबाळ वृद्धाश्रमास भेट देऊन आश्रमात असलेले सर्व वृद्धांच्या आरोग्याची मोफत तपासणी करून त्यांना आपल्या जवळील औषध दिले. यावेळी वृद्ध आजी-आजोबानी डॉ.कुमार पाटील यांचा वाढदिवस केक कापून व औक्षण करुन साजरा केला व त्यांना उत्तम आरोग्य दिर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना करून आशिर्वाद दिला.
यावेळी वृद्धाश्रमचे संस्थापक -सुरेश सासणे, संचालिका -शोभाताई पाणदारे, आंदोलन सम्राट -विश्वास बालीघाटे,भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते बिरदेव यंगारे आदी उपस्थित होते.