प्रेस मीडिया लाईव्ह :
शिरोळ/प्रतिनिधी:
श्री दत्त पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये शैक्षणिक वर्ष 2023 - 24 साठी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद नवी दिल्ली यांनी प्रवेश क्षमता वाढीस मान्यता दिली आहे. त्यामुळे शिरोळ तालुक्यातील विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षणाची प्रवेश घेण्याकरिता संधी वाढली आहे.
सिव्हिल इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग व मेकॅनिकल इंजिनिअरिंग अशा विविध डिप्लोमा कोर्ससाठी प्रवेश घेऊन परिसरातील विद्यार्थ्यांनी विज्ञानाबरोबर तंत्रज्ञानाची कास धरावी, असे आवाहन दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन उद्यानपंडित गणपतराव पाटील, एक्स ऑफिसिओ ट्रस्टी एम. व्ही. पाटील व ट्रस्ट डायरेक्टर ए. एम. नानिवडेकर यांनी केले आहे.
प्रथम वर्षाबरोबर थेट द्वितीय वर्षामध्ये प्रवेश घेण्यासाठीची सुविधा सोमवारी दिनांक 12 जून 2023 पासून सुरू होत असून विद्यार्थी स्वत: अथवा पालक सुविधा केंद्रावर आपला प्रवेश अर्ज भरु शकतो. तसेच कागदपत्रांची छाननीही करु शकतो.
अर्ज दाखल करणे, कागदपत्रांची पडताळणी व त्याची निश्चिती करण्याची मुदत 12/6/ 2023ते 03/7/2023 पर्यंत आहे. त्यानंतर 05/07/2023 ला तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर होईल. 06/7/23 ते 09/07/23 दरम्यान गुणवत्ता यादीमध्ये तक्रार करण्यास मुदत असेल. 11/7/23 रोजीअंतिम गुणवत्ता यादी जाहिर होणार आहे.
सुविधा केंद्रावर विद्यार्थ्यांना अर्ज दाखल करण्यासंदर्भात मार्गदर्शन व अर्ज भरुन देण्याची सुविधा उपलब्ध आहे. तरी विद्यार्थ्यांनी शिरोळ येथील श्री दत्त पॉलिटेक्निकमधील सुविधा केंद्रास भेट देवून आपला अर्ज दाखल करावा अशी माहिती प्राचार्य पी. आर. पाटील व सुविधा केंद्राचे प्रमुख ए. इ. पाटील यांनी दिली.