प्रेस मीडिया लाईव्ह
विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील
उरण तालुक्यात मे महिन्याच्या सुट्टीत प्रथम एज्युकेशन फाऊंडेशनने विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये या साठी उन्हाळी शिबीराचे आयोजन केले होते. या वर्गात मुलांना भाषेचे आणि गणिताचे धडे हे खेळाच्या माध्यमातून देण्यात आले , तसेच उन्हाळी शिबीराचे वैशिष्ठ्य असे होते की मुलांना वर्गात कंटाळा येऊ नये यासाठी दर शनिवारी सुपर शिनिवार राबविण्यात येत होता. यात मुलांच्या वेगवेगळ्या कला गुणांना वाव देण्यासाठी चित्रकला स्पर्धा , नाटिका सादरीकरण ,विविध मनोरंजन पर खेळ घेण्यात आले ,यात गावातील स्वयंसेवकांनी प्रथम प्रनिनिधिंना सहकार्य केले.
यामुळे संपूर्ण मे महिना ते अगदी शाळा चालू होई पर्यंत मुलांना भाषा, गणिताचे धडे घेत असताना कंटाळा आला नाही तसेच या शिबीराचे आणखी एक खास वैशिष्ठ्य म्हणजे शिबीरामध्ये मुलांना रोज गोष्ट ऐकविली जात होती. सदर शिबीरात मुले या गोष्टींवर नाटिका सादर करत होते एकंदरीत प्रथम मार्फत चालत असलेल्या या उन्हाळी शिबीरासाठी गावकऱ्यांकडून आणि मुलांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.
या उपक्रमाला प्रथम कोकण विभाग प्रमुख भोजराज क्षीरसागर यांनी उरण प्रथम टीम ला वेळोवेळी मार्गदर्शन केले .तसेच उरण मधील सामाजिक संस्थांनीही चांगले सहकार्य केले .