प्रेस मीडिया लाईव्ह :
विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील
रायगड जिल्हा परिषद शाळा पाले येथे बुधवार दिनांक 28 जून 2023 रोजी आषाढी एकादशी निमित्त पालखी मिरवणूक सोहळा व दिंडीचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. मेनन म्हात्रे, उपाध्यक्षा, सदस्य, व पालक तसेच मुख्याध्यापिका सौ . पुष्पलता म्हात्रे मॅडम , सहकारी शिक्षिका सौ चैताली म्हात्रे मॅडम आणि विद्यार्थी उपस्थित होते .
दिंडीसाठी विद्यार्थ्यांनी सुंदर अशा पारंपारिक वारकरी वेशभूषा आणि विठ्ठल रखुमाई च्या वेशभूषा परिधान केल्या होत्या. शाळेतील शिक्षिका चैताली म्हात्रे मॅडम यांनी आषाढी एकादशीचे महत्त्व मुलांना पटवून दिले आणि शाळेच्या मुख्याध्यापिका सौ पुष्पलता म्हात्रे मॅडम यांनी वारकरी दिंडी ची माहिती मुलांना दिली. त्यानंतर सर्व मुलांनी टाळ व मृदुंगाच्या गजरात विठ्ठल नाम घोष करत उत्साहात नृत्य सादर केले.मुलींनी रखुमाई रखुमाई या गाण्यावर नृत्याचे सादरीकरण केले मुलींनी फुगड्या घातल्या त्यानंतर मोठ्या उत्साहात वाजत गाजत पालखी सह दिंडी निघाली
गावातील ग्रामस्थांनी पालखीचे जोरदार स्वागत केले .गावाच्या देवळात पालखीचे आगमन झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी रिंगण तयार करून वारकरी नृत्य सादर,तर काही विद्यार्थ्यांनी अभंग गीते टाळ्यांच्या गजरात सादर केली. त्यांच्या समवेत एकंदरीत अशा मंगलमय वातावरण निर्मितीमुळे जणू प्रत्यक्ष आपण पंढरीरायाच्या नगरीत असल्याचा अनुभव सर्वांना यावेळी झाला.या कार्यक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ पुष्पलता म्हात्रे मॅडम सहकारी शिक्षिका सौ चैताली म्हात्रे मॅडम शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मेनन म्हात्रे , उपाध्यक्षा, सर्व सदस्य, पालक, विद्यार्थ्यांनी मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला.