प्रेस मीडिया लाईव्ह
विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील
पनवेल : पनवेल महानगरपालिका क्षेत्रामधील सिडको विभागातील मालमत्ता कराबाबत अजूनही संभ्रम आहे. चुकीच्या पद्धतीने लावलेल्या दुहेरी मालमत्ता कर भरण्याबाबत पालिकेने रहिवाश्यांना नोटीस बजावल्या आहेत. यावर प्रितम म्हात्रे यांनी वेळोवेळी सवलती संदर्भात पाठपुरावा केलेला आहे.
मालमत्ता करमाफीसाठी नवी मुंबई महापालिकेने प्रस्ताव सादर करावा अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. मुंबई महापालिकेच्या धर्तीवर नवी मुंबईतही 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करमाफी देण्यास सरकार अनुकुल आहे. मुख्यमंत्र्यांनी ऐरोली आणि बेलापूर मतदारसंघातील विविध विषयांसंदर्भात आढावा बैठक घेतली. नवी मुंबई महानगरपालिकेने PAP (प्रकल्प प्रभावित व्यक्ती) निवासी मालमत्तांसाठी मालमत्ता कर दंड वसूलीचा निर्णय तात्काळ स्थगित ठेवला आहे. गावठाण कार्यक्षेत्रातील गरजेपोटी बांधलेल्या घरांच्या मालकांकडून मालमत्ता वसुली करण्यावर भर देण्यात आला होता. राज्य सरकारने याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केल्यानंतरच प्राधिकरण पुढील निर्णय घेईल, असे समजले आहे.
चौकट
पनवेलच्या शेजारीच असलेल्या नवी मुंबई महानगरपालिकेने 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करमाफी देण्यास शासनाकडे मागणी केलेल्या धरतीवर त्याचा योग्य तो अभ्यास करून त्याची माहिती मागवून पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील 500 चौरस स्क्वेअर फिट पर्यंत असलेल्या घरांना करमाफी करण्यात यावी.-प्रितम जनार्दन म्हात्रे,मा. विरोधी पक्षनेता, पनवेल महानगरपालिका