राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 24 व्या वर्धापन दिनानिमित्त येरवडा भागात उपक्रम.

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ओ.बी.सी सेलच्या उपाध्यक्ष कु. पूजा विलास काटकर यांच्या संकल्पनेतून "समाजाच्याप्रती कर्तव्याचा एक हात निसर्गाला साथ".या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी वर्गाकडून शासकीय दिव्यांग वस्तीगृह येरवडा येथे  स्वच्छता मोहीम व वृक्षारोपणाचे चित्र काढून, विविध 24 घोषवाक्य देत विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आले.

संकल्पनेचा उद्देश म्हणजे सामाजिक उपक्रम राबवत असताना विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देत त्यांचा सर्वांगीण कौशल्यआत्मक विकास व सकारात्मक विचार अंतकरणात रुजवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न.

आजच्या उपक्रमाला प्रमुख उपस्थिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ओ.बी.सी सेल शहरअध्यक्ष मा. दीपकदादा जगताप व समाजसेवक तथा सल्लागार मा. रियाज पठाण  देखील उपस्थित होते व त्यांचं मोलाचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना भेटलं.

उपस्थित विद्यार्थी:- अवधूत सोनार, बिलाल शेख, रुद्र देवकर, जिक्रा शेख, वीर राक्षे, अर्कान सय्यद, शाफ्रीन सय्यद, रिमशा सय्यद, आलिया शेख, आहिल शेख,  मायरा शेख, इनाया शेख, अफशा शेख.


कु. पूजा काटकर

उपाध्यक्ष ओ. बी.सी सेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर.

Post a Comment

Previous Post Next Post