प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा जन्मदिवस २६ जून सामाजिक न्याय दिनी समाज कल्याण सहायक आयुक्त कार्यालयातर्फे अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेचे श्री शाहू मंदीर महाविद्यालय, पर्वती पायथा येथून प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.
अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेचे श्री शाहू मंदीर महाविद्यालय, पर्वती पायथा येथे सामाजिक न्याय दिनाचे समाजकल्याण आयुक्त समाज कल्याण डॉ. प्रशांत नारनवरे अध्यक्षतेखाली व जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजन करण्यात आले आहे.
सामाजिक न्याय दिन अधिक लोकाभिमुख होण्याच्या दृष्टीने व जनतेमध्ये सामाजिक न्यायाच्याप्रती अधिक जागरूकता निर्माण व्हावी यासाठी या प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. राजीव गांधी ॲकेडमी ऑफ ई- लर्निंग स्कुल अँड सायन्स ज्युनिअर कॉलेज, अनुराग सोसायटी, शिवदर्शन पूरग्रस्त वसाहत, पर्वती पायथा, पुणे येथून प्रभातफेरीचे आयोजन करण्यात येणार असून श्री शाहू मंदीर महाविद्यालय पर्वती पायथा येथे समारोप होणार आहे.
या कार्यक्रमासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पुणे जिल्ह्याचे समाज कल्याण सहायक आयुक्त कैलास आढे यांनी केले आहे.