प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्ष आबेदा इनामदार यांचा सत्कार ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा.शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आला.
संभाजी ब्रिगेडच्या वतीने ३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित सोहळ्यात ६ जून रोजी हा सत्कार लाल महाल येथे झाला.पगडी आणि शिव प्रतिमा देऊन हा सत्कार करण्यात आला. यावेळी संभाजी ब्रिगेडचे विकास पासलकर, प्रवीण गायकवाड ,खासदार वंदना चव्हाण, माजी आमदार मोहन जोशी,आमदार रवींद्र धंगेकर,दीपक मानकर आदी उपस्थित होते.
Tags
पुणे