प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : विद्येच्या माहेर घरात आपल्या हक्कासाठी शिक्षकांना आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागतो हे दुर्दैव म्हणावे लागेल . एक तर पुणे शहराचे तापमान इतके आहे की पाच पाच मिंटाला पाण्याची गरज भासते पण याचे कोणाला सुख दुःख नाही . आज उपोषणाचा दुसरा दिवस तरीही मनपाचे अधिकारी उपोषण स्थळी फिरकले नाहीत.
पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागात काम करणाऱ्या रजा मुदतीतील ९३ शिक्षण सेवकांना नियमित वेतनश्रेणी २०१७ (एप्रिल) पासून लागू करावी. या मागणीसाठी सर्व शिक्षण सेवक महापालिका भवनासमोर आमरण उपोषणास बसले आहेत.
या आंदोलनाला काँग्रेस आणि भाजपने पाठिंबा दिला आहे. तसेच महापालिका प्रशासनासोबत चर्चा करून हा प्रश्न सोडवण्याची मागणी काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांनी केली आहे. काँग्रेस कडून सकाळी आमदार रविंद्र धंगेकर मोहन जोशी , अभय छाजेड नेत्यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. त्यांची समस्या जाणून घेतली. तसेच प्रशासनासोबत चर्चा करून शिक्षकांना न्याय देण्याची मागणी केली. तर दुपारी भाजपचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी आंदोलन स्थळी भेट दिली. मुळीक यांनी देखील प्रशासना सोबत चर्चा केली. तसेच याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी केली.